मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune News: दुर्देवी! एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुण्यातील मीराचा वीज कोसळल्याने जागीच मृत्यू

Pune News: दुर्देवी! एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुण्यातील मीराचा वीज कोसळल्याने जागीच मृत्यू

Pune Lightning Strike:  पुण्यातील ही तरुणी आपल्या वडीलांसोबत होती. हिच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे शेजारी उभे असलेले वडिलही काही प्रमाणात भाजल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे, 7 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्याच्या (Pune News) आंबेगाव तालुक्यातील एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील खडकी पिंपळगाव येथे अंगावरती वीज कोसळून 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार (Heavy Rain in Pune) पाऊस सुरू आहे. दरम्यान अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटनाही (Lightning Strike in Pune) पाहायला मिळत आहे. यातच पुण्यातील एका 19 वर्षीय मुलीला वीज कोसळल्यामुळे जीव गमवावा (Girl Dies Due to Lightning in Pune) लागला आहे. या घटनेनंतर गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशात पावसादरम्यान वीज पडून हजारो लोकांचा मृत्यू होता. त्यामुळे अशा दिवसात काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातं. पुण्यातील ही तरुणी आपल्या वडीलांसोबत होती. हिच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे शेजारी उभे असलेले वडिलही काही प्रमाणात भाजल्याचं सांगितलं जात आहे. मीरा लोहकरे असं या मृत मुलीचं नाव आहे. मीराच्या वडिलांचं नाव सखाराम लोहकरे असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता नवं अस्मानी संकट; शेतीची कामं उरकण्यासाठी शेतकऱ्यांकडे अवघा एक आठवडा बाकी दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीनं चक्रीवादळ (Cyclone Shaheen) तीव्र झालं आणि ते ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं होतं. चक्रीवादळ किनापट्टीवर धडकल्यापासून देशात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. येथील मस्कटसह अनेक शहरं जलमय झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसापासून विजांसह पाऊस पाहायला मिळत आहे.
First published:

Tags: Pune, Pune rain

पुढील बातम्या