Home /News /pune /

तिचा जीव वाचला असता..! पुण्याच्या प्रसिद्ध रुग्णालयाने केलेली कोरोना चाचणीची सक्ती जीवावर बेतली

तिचा जीव वाचला असता..! पुण्याच्या प्रसिद्ध रुग्णालयाने केलेली कोरोना चाचणीची सक्ती जीवावर बेतली

Pune News: आपत्कालीन स्थितीतही पुण्यातील ससून रुग्णालयानं कोरोना चाचणीची सक्ती केली. ज्यामध्ये 17 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

    भोर, 08 मे: सर्पदंश झालेल्या एका मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयाने (Sassoon Hospital) कोरोना चाचणी (Corona test) करण्याची सक्ती केल्यानं तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. काल भोर तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीला सर्पदंश (Snake bite) झाला होता. सर्पदंश झाल्यानंतर तिला तातडीनं नरसापूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. याठिकाणी सर्पदंशावरील प्राथमिक लस घेतल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं. याठिकाणी रुग्णालय प्रशासनाने सर्पदंशावरील लस देण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्याची सक्ती केली. त्यामुळे वेळेत लस न मिळाल्यानं संबंधित मुलीचा मृत्यू झाला आहे. संबंधित 17 वर्षीय मृत मुलीचं पूजा रामदास मोहिते असून ती भोर तालुक्यातील कांबरे खेबा येथील रहिवासी आहे. तिला काल विषारी सापानं दंश मारला होता. यावेळी कुटुंबीयांनी तातडीनं नरसापूर येथील आरोग्य केंद्रात दाखल केलं. याठिकाणी सर्पदंशावरील प्राथमिक लस देण्यात आली. पण मुलीचा जीव वाचवण्यासाठी एका दुसऱ्या लशीची गरज होती. पण संबंधित आरोग्य केंद्रात ती लस उपलब्ध नसल्यामुळं तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं. हे वाचा-BREAKING: कंगना रणौतला कोरोनाची लागण, अभिनेत्री स्वत: दिली माहिती अर्धमेल्या मुलीला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी संबंधित मुलीची कोरोना चाचणी करण्याची सक्ती केली. ही  कोरोना चाचणी करण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी गेला. दरम्यान संबंधित मुलीची प्रकृती खालावत गेली. योग्य वेळेत सर्पदंशावरील लस न मिळाल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपत्कालीन स्थिती असूनही रुग्णालय प्रशासनाने कोरोना चाचणीचा हट्ट केला. यामुळे रुग्णालयाच्या हट्टामुळे सर्पदंश झालेल्या मुलीचा हकनाक बळी गेला आहे. हे वाचा-Shocking! कोरोनामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या मुलीच्या मृत्यूनंतर नातेवाईंकांनी प्रशासनाच्या ओंगळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. कोरोना चाचणीचा हट्ट न करता, सर्पदंशावरील लस वेळेत दिली असती तर तिचा जीव वाचला असता, अशी खंत नातेवाईकांनी बोलून दाखवली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune news, Snake

    पुढील बातम्या