पुणे, 09 डिसेंबर : 'पुणे तिथे काय उणे' (pune) असं उगाच म्हटलं जात नाही. ऐन थंडीच्या हंगामात पुण्यातील कोथरुड(kothrud) परिसरात चक्क एक गवा सोसायटीत आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यासारख्या शहरात गव्याचे दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कोथरुड येथील महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक 1 येथील मोकळ्या जागेमध्ये आज सकाळी हा गवा दिसला. नेहमीप्रमाणे, सकाळी मॉर्निंग वॉक, जॉगिंग करण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. त्यावेळी महात्मा सोसायटीच्या मोकळ्या जागेत भलामोठा गवा पाहण्यास मिळाला. आधी लोकांना गाय असावी असं वाटलं. पण, तो गवा असल्याचे निदर्शनास येताच एकच भंबेरी उडाली. लोकांनी महात्मा सोसायटीच्या परिसरापासून दूर पळ काढला.
केमिकल कंपनीत अग्नितांडव, भीषण स्फोटाने हादरला परिसर, LIVE VIDEO
तब्बल 10 फूट उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा गवा मोकळ्या जागेमध्ये शिरला असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या गव्याला पाहण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केली आहे. गवा निदर्शनास आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी तातडीने याची माहिती पुणे पालिका आणि वनविभागाला कळवली आहे.
Viral Photo: चित्रात जीवंत माणूस उतरवणारा रत्नागिरीचा अवलिया...
मुळात गवा हा कोल्हापूर परिसरात आढळत असतो. कोल्हापूरमध्ये आढळणारा गवा पुण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निवास्थानही याच महात्मा सोसायटीच्या परिसरात आहे. त्यामुळे स्थानिकांनी चंद्रकांत पाटील यांनाही आपल्या परिसरात गवा आल्याची माहिती दिली आहे. गव्याला पकडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
(फोटो सौजन्य - अविनाश जोशी)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.