पुणे, 19 जानेवारी : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. पुण्यातील (Pune) टिळक रस्त्यावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, ड्युटीवर असलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यावर पडलेला काचांचा खच स्वत: हातात झाडू घेऊन साफ केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घडलेली हकीकत अशी की, सोमवारी सायंकाळी या रस्त्यावर एस. पी कॉलेज चौकात रिक्षा आणि दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, दुचाकी अणि रिक्षा यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. यामुळे भर चौकात रस्त्यावर काचांचा खच साचला होता.
याचवेळी तेथे खडक वाहतूक विभागाचे एक महिला व एक पुरुष वाहतूक पोलीस वाहतूक तैनात होते. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी वाहतूक तर सुरळीत करून दिली.
हा' विजय कायम लक्षात राहिल,पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी केले टीमचे कौतुक
परंतु, याचबरोबर रस्त्यावर साचलेल्या काचांमुळे इतर कोणाचाही अपघात घडू शकतो या भावनेने तिथे असलेल्या खडक वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस रजिया फैयाज सय्यद यांनी जबाबदारीच्या भावनेतून शेजारीच असलेल्या अमृततुल्य चहाच्या स्टॉलमधील झाडू घेऊन रस्त्यावरच्या काचा बाजूला केल्या. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या कामामुळे अपघात टळले आहे. त्यांच्या या कार्याचे पुणेकरांनी कौतुक केले.