Home /News /pune /

पुण्यात 'मुळशी पॅटर्न', कुख्यात गुंडांच्या टोळक्याने वाईन शॉप फोडले, मालकाकडे मागितले 25 लाख!

पुण्यात 'मुळशी पॅटर्न', कुख्यात गुंडांच्या टोळक्याने वाईन शॉप फोडले, मालकाकडे मागितले 25 लाख!

काही दिवसांपूर्वीच याच टोळक्याशी संबंधित लोकांनी उरुळी कांचन मधील भर चौकात दहशत माजवून पोलिसाला मारहाण करण्यापर्यंत मजल गेली होती.

    सुमित सोनवणे, प्रतिनिधी हवेली, 15 जुलै : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधील कोरेगाव मुळ येथील कुख्यात गुंड गोरख कानकाटे याच्या निकटवर्तीय असलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने शेजारील एका दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला मारहाण करून 25 लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आहे. संबंधित दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी जेनिथ वाईन्स या दुकानाचे मालक विशाल मुभाष मोहेकर (रा. यशोलक्ष्मी अपार्टमेट, शिवाजीनगर पुणे ) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. संघ कधी श्रेयासाठी काम करत नाही, धारावीवरुन आदित्य ठाकरेंचा पाटलांवर पलटवार या तक्रारीनुसार, गुंड गोरख कानकाटे याचा निकटवर्तीय असलेल्या मंगेश कानकाटे याच्यासह अन्य सहा जनांवर खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार दारू विक्रेता विशाल मोहेकर दुकानात बसले होते. तोंडाला कपडा बांधलेला एक तरुण दुकानात आला. गोरख कानकाटे यांच्या कार्यालयातून फोन असल्याचे सांगून मोहेकर यांना फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकला. फोनमधून बोलणाऱ्या व्यक्तीने मोहेकर यांना "तुम्हाला जर या भागामध्ये धंदा करायचा असेल, तर तुम्हाला मंगेश कानकाटे याला 25 लाख रूपये खंडणी द्यावी लागेल. जर पैसे दिले नाही, तर तुम्हाला जिवे ठार मारीन" अशी धमकी अशी देण्यात आली. त्यानंतर संबंधित तरुण त्या ठिकाणाहून निघून गेला. हनीमूनसाठी जमवले होते 6 लाख, होणाऱ्या नवऱ्याने न सांगता खरेदी केला गेमिंग पीसी दुसऱ्या दिवशी सकाळी खंडणीचे काय झाले असे म्हणत पाच ते सहा अनोळखी तोंडाला रूमाल बांधलेल्या तरुणांनी लाकडी दांडकी, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीच्या साह्याने दुकानात व्यवस्थापकाला मारहाण केली. खंडणीच्या उद्देशाने झालेली मारहाण पाहता दारू विक्रेत्या व्यावसायिक विशाल मोहेकर यांनी लोणी काळभोर पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच याच टोळक्याशी संबंधित लोकांनी उरुळी कांचन मधील भर चौकात दहशत माजवून पोलिसाला मारहाण करण्यापर्यंत मजल गेली होती. त्यामुळे गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Pune crime, Pune news

    पुढील बातम्या