पुणे, 16 मार्च: पुणे परिसरातील ग्रामीण भागात मंदिरात चोरी (Theft in temple) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी चार मंदिरावर डल्ला मारून मौल्यवान ऐवज लंपास केला आहे. रात्री गावात सामसूम असताना चोरट्यांनी मंदिरातील देव देवतांचे दागिने आणि मुखवटे चोरून (stealing crown and ornament of God pune) नेले आहेत. या चारही चोरीच्या घटना भोर परिसरातील (Crime in pune) केतकावळे, पिसावरे, सावरदरे, आंबाडे या गावांत घडल्या आहेत. या परिसरातील मंदिरात चोऱ्या करणारी टोळी सक्रिय झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर परिसरात केतकावळे, पिसावरे, सावरदरे, आंबाडे या चार गावांमधील मंदिरात रात्रीचा वेळी चोरी झाली आहे. या चारही मंदिरातील देवी देवतांचे चांदी आणि सोन्याचे मुखवटे चोरी करण्यात आले आहे. या परिसरात एकाच रात्रीत अनेक ठिकाणी चोरी होत असल्याने मुखवटे चोरणारी टोळीच सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा - रेल्वेच्या पँट्रीमध्ये सापडलेल्या 1.40 कोटी रुपयांचा मालक कोण? रहस्य कायम
आज पहाटे आंबडे गावातील जाणाई मंदिरात सर्वात मोठी चोरी झाली आहे. चारही चोरीच्या घटनेमध्ये जवळपास 15 किलो चांदी तर 3 तोळं सोनं असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व मंदिरांमध्ये cctv कॅमेरे बसवण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune crime news, Theft