पुणे, 10 ऑक्टोबर : गणेशोत्सवामध्ये (Pune Ganeshotsav) वेगवेगळ्या गणेश मंडळांकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीसही तशी खास असतात. काहींना खरेदीचं कुपन तर घरात लागणारी एखादी वस्तू यादरम्यान बक्षीस म्हणून दिली जाते. पुणेकरांनी (Pune News) मात्र असं काही बक्षीस दिलं की उभा महाराष्ट्र पाहत राहिला.
त्याचं झालं असं की, पुण्यातही एका गणेश मंडळाने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये ज्या महिला विजयी होतील त्यांना थेट हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात येईल, असे या गणेश मंडळाने (Ganesh Mandal) सांगितले होते. गौरी-गणपती सजावटीसाठी थेट हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन मिळत असल्याने महिलांच्या आनंदाचा पारावार उरला नव्हता.
हे ही वाचा-पाळत ठेवण्यासाठी सुनेच्या बेडरूममध्ये लावला CCTV; सासू, सासरा आणि नणंदेचं भयंकर
बऱ्याच दिवसांपूसन विजेत्या महिला हेलिकॉप्टरमध्ये बसून पुणे शहर बघण्याची वाट पाहत होत्या. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि विजेत्या पाच महिलांचे हे स्वप्न शेवटी साकार झाले. विजयी महिलांना हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात आलं आहे. संसार, मुलंबाळामध्ये अडकलेल्या या महिलांसाठी हा फार चांगला अनुभन होता. (Ganesh Mandal in Pune made a helicopter trip for women as a gift in Gauri Ganpati decoration)
स्पर्धेमध्ये पाच महिला विजयी झाल्या होत्या. या पाचही महिलांना हेलिकॉप्टरमधून सैर घडवण्यात आली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हवेत उडण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्हाला खूप आनंद झाला, अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganesh chaturthi, Helicopter, Pune