पुणे पालिकेत स्वीकृत सदस्य निवडीच्या वादातून हाणामारी

पुणे पालिकेत स्वीकृत सदस्य निवडीच्या वादातून हाणामारी

भाजप कार्यालयात गणेश बीडकर आणि गणेश घोष यांचे कार्यकर्ते आपसात भिडले.

  • Share this:

18 एप्रिल : पुणे महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीच्या वादातून हाणामारी झालीय. भाजप कार्यालयात गणेश बीडकर आणि गणेश घोष यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. महानगरपालिकेतल्या भाजप चेंबरमध्ये ही हाणामारी झालीय.

गणेश घोष हे भाजपचे पुणे शहर माजी युवा अध्यक्ष आहेत,तर बीडकर हे भाजपचे माजी गटनेते आहेत.पालिकेतल्या भाजप कार्यालयात ही मारामारी झाली यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.

गणेश बीडकर यांचा काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. स्वीकृत सदस्यांसाठी आपली वर्णी लागावी यासाठी दोघंही इच्छुक होते. त्याच वादातून ही मारामारी झाली. त्यात गणेश घोष जखमी झालेत.

या घटनेतून भाजप अंतर्गत वाद समोर आलाय. त्याचं निवारण वरिष्ठ नेते करतायत.

पुणे महानगरपालिकेला सध्या धावणीचं स्वरूप आलंय. इतका पोलीस बंदोबस्त तिथे ठेवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 05:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading