मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं यंदा अत्यंत साधेपणानेच विसर्जन.. पाहा VIDEO

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं यंदा अत्यंत साधेपणानेच विसर्जन.. पाहा VIDEO

महाराष्ट्रात गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे लाडक्या बाप्पाला अत्यंत साधेपणाने निरोप देण्यात आला.

पुणे, 1 सप्टेंबर: राज्यभरात आज अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. दरवर्षी महाराष्ट्रात गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे लाडक्या बाप्पाला अत्यंत साधेपणाने निरोप देण्यात आला. हेही वाचा...औरंगाबादेत शिवसेना-MIM आमने-सामने; खासदार इम्तियाज जलील यांचं आंदोलन मागे पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळात अत्यंत साधेपणाने संपन्न झालं. पहिला मानाचा कसबा गणपतीचं 11.30ला, दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 12.30 ला, तिसरा मानाचा गुरुजी तालीम गणपतीचं 12.45 ला, चौथा मानाचा तुळशीबाग गणपतीचं 1.15 आणि पाचवा मानाचा केसरीवाडा गणपतीचं दुपारी 1.30 विसर्जन करण्यात आलं. मंडळासमोरच तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात यंदा अगदी शांततेत विसर्जन करण्यात आलं. तर पुण्यातील महत्त्वपूर्ण समजला जाणारा भाऊ रंगारी गणपतीचं दुपारी 2.45 वाजता विसर्जन झालं. यंदा कसबा गणपतीसमोर कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणारे पोलीस, डॉक्टर, नर्सेस आणि सफाई कर्मचाऱ्यांना मानवंदना देणारे रांगोळी काढली होती. दरम्यान, दरवर्षी पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. अलका चौकात तर भाविकांचा महापूर लोटतो. या दिवशी संपूर्ण पुण्यात ढोल ताशांचा गजर असतो. यंदा मात्र कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने बाप्पाला निरोप दिला जात आहे.
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या