मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात लॉकडाऊनमुळे जुगाऱ्यांनी बंगल्यालाच बनवलं अड्डा; 20 जण ताब्यात, तर लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुण्यात लॉकडाऊनमुळे जुगाऱ्यांनी बंगल्यालाच बनवलं अड्डा; 20 जण ताब्यात, तर लाखोंचा मुद्देमाल जप्त

Crime in Pune: पुण्यात काहीजण कोरोना नियम धाब्यावर बसवून एका बंगल्यात एकत्र येऊन जुगार खेळताना आढळले (Gamblers turn bungalow into gambling point) आहेत. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी संबंधित बंगल्यात छापा टाकून 20 जणांना ताब्यात (20 Arrest) घेतलं आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 30 मे: कोरोना विषाणूच्या (Corona virus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून पुण्यात लॉकडाऊनची (Lockdown in Pune) अंमलबजावणी केली जात आहे. त्याचबरोबर शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईदेखील केली जात आहे. असं असताना काहीजण कोरोना नियम धाब्यावर बसवून एका बंगल्यात एकत्र येऊन जुगार खेळताना आढळले (Gamblers turn bungalow into gambling point) आहेत. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी संबंधित बंगल्यात छापा टाकून 20 जणांना ताब्यात (20 Arrest) घेतलं आहे. तसेच यावेळी लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील विद्यासागर कॉलनीतील एका बंगल्यात अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली. त्यानुसार मार्केट यार्ड पोलिसांनी शनिवारी दुपारी संबंधित बंगल्यावर छापा टाकला. यावेळी बंगल्याला बाहेरून कुलूप लावण्यात आलं होतं. खिडकीतून पाहाणी केली असता, आतमध्ये 15 ते 20 जण जुगार खेळताना आढळले.

हे ही वाचा-पुण्यात फार्महाऊसवर डान्सबार, दिवसाढवळ्या सुरु होता धांगडधिंगा

संबंधित जुगाऱ्यांची चौकशी केली असता, सर्व आरोपी हर्षल पारेख नावाच्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून याठिकाणी जुगार खेळण्यासाठी जमल्याचं सांगितलं. दरम्यान पारेख यांने जुगार खेळणाऱ्यांना 'तुम्हाला जेवण घेऊन येतो', असं सांगत बंगल्याला बाहेरून कुलूप लावल्याचंही आरोपींनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी दार उघडून आत छापा टाकल्यानंतर एकूण 54 हजार रुपयांच्या रोकडसह एक बुलेट दुचाकी असा एकूण 1 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

हे ही वाचा-Vasai : पोलिस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, टाटांशी संबंध असल्याच्या करायचा बाता

दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण  20 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरुद्ध संचारबंदी आदेशाचं उल्लंघन करणे, बेकायदेशीररीत्या जुगार खेळणे आणि विनामास्क एकत्र येणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune