S M L

पैसा ही समस्या नाही, अधिकारी काम करत नाहीत - नितीन गडकरी

अधिकारी,कंत्राटदार यांच्यावर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात चांदणी चौक उड्डाण पुलाचं भूमिपूजन तसेच पुणे सिन्नर मार्गावरील 5 रस्त्यांच्या चौपदरीकरण कामाचं लोकार्पण करताना अपेक्षेप्रमाणे फटकेबाजी केली.

Sonali Deshpande | Updated On: Aug 27, 2017 02:07 PM IST

पैसा ही समस्या नाही, अधिकारी काम करत नाहीत - नितीन गडकरी

पुणे, 27 आॅगस्ट : अधिकारी,कंत्राटदार यांच्यावर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात चांदणी चौक उड्डाण पुलाचं भूमिपूजन तसेच पुणे सिन्नर मार्गावरील 5 रस्त्यांच्या चौपदरीकरण कामाचं लोकार्पण करताना अपेक्षेप्रमाणे फटकेबाजी केली.

'विकासकामे करताना पैसे ही समस्या नाही तर अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे.त्यांच्यामागे दंडुका घेऊन फिरावं लागतं. टाऊन प्लॅनिंग विभाग हा सर्वात भुक्कड विभाग आहे,फुकटाला महाग असलेले नगर रचना विभागातील लोक काही कामाचे नाहीत.पुण्याचा विकास करायचा असेल तर बाहेरच्या  एजन्सीला काम द्या.'अशी फटकेबाजी पवारांनी केली.

पुणे सातारा रस्त्याचं रखडलेलं रुंदीकरण हा काळा डाग आहे, असंही ते म्हणाले. मुळा, मुठा नदीत जलमार्ग, ड्राय पोर्ट्स उभारण्याकरता राज्य सरकारने  एनओसी द्यावी, असंही त्यांनी सांगितलं.पुण्यात इलेक्ट्रिसिटीवरील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही असं सांगत पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा सरस होईल असा दावा त्यांनी केला. या कार्यक्रमाला शरद पवार,चंद्रकांत पाटील, गिरीश बापट,अनिल शिरोळे, शिवाजी आढळराव हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2017 01:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close