पुणे, 28 मे: पुण्यात (Pune) एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हवेली तालुक्यातल्या वाघोली परिसरात ही आग लागली आहे. या आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओ पाहिल्यावर या आगीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. (Furniture shop caught fire)
पुणे-नगर रोड (Nagar Road) वर असणाऱ्या एका मोठ्या फर्निचरच्या दुकानाला आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत दुकानाचं कोट्यवधीचं नुकसाना झालं आहे.
पुणे: हवेली तालुक्यातील वाघोली येथे एका दुकानाला भीषण आग #Pune #Punefire pic.twitter.com/JnFOfHAlfU
— News18Lokmat (@News18lokmat) May 28, 2021
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. सध्या अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीच्या घटनेनं नगर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
हेही वाचा- क्रूरतेचा कळस! पुण्यात विकृताने धारदार शस्त्राने मुक्या जीवाचे फोडले डोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.