फेसबुकवरील मैत्रीनं केला घात! पुण्यातील तरुणीवर बलात्कार; 2 युवतींसह चौघांना अटक

फेसबुकवरील मैत्रीनं केला घात! पुण्यातील तरुणीवर बलात्कार; 2 युवतींसह चौघांना अटक

Rape in Pune: सोशल मीडियावर मैत्री (Social media friendship) करून एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 07 मे: सोशल मीडियावर मैत्री (Social media friendship) करून एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने संबंधित युवतीला गुंगीचं औषध देवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तिचे अश्लील फोटो (obscene photo) काढून तिला ब्लॅकमेल (Blackmail) केलं आहे. आरोपींनी पीडितेच्या भावाला आणि तिच्या मित्रांना अश्लील पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह चौघांना अटक केली आहे.

विशाल जयपाल चिल्लर (28), पूजा सिंग (25), समीर चौधरी (27), ज्योती अशी या चार आरोपींची नावं असून हे सर्वजण दिल्ली येथील रहिवासी आहे. फिर्यादीची काही दिवसांपूर्वी पुजा सिंग हिच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. यानंतर तिने पीडितेची आरोपी विशाल चिल्लरशी ओळख करुन दिली. दरम्यान पीडित तरुणी आणि विशाल यांच्यात फोनवरुन सातत्यानं बोलणं होऊ लागलं. दरम्यान नोव्हेंबर 2020 मध्ये आरोपी विशाल फिर्यादीला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. यावेळी त्यांनं दिल्लीतून तुझ्यासाठी मिठाई घेऊन आलो असून ती मिठाई लॉजवर ठेवल्याची बतावणी केली. ही मिठाई घरी घेऊन जा असं सांगत त्यानं पीडित तरुणीला लॉजवर घेऊन गेला.

हे वाचा-Pune: बहिणीच्या 3 वर्षाच्या मुलाला संपवलं; अनैतिक संबंधातून पाण्यात बुडवून हत्या

याठिकाणी त्यानं गुंगीचं औषध टाकलेली मिठाई तिला खाऊ घातली आणि तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्यानं तिचे अश्लील फोटोही काढले. यानंतर आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या वेळी तिचाकडून दागिने आणि एक लाख रुपयांची रोकडही घेतली. यानंतरही आरोपीने तिला ब्लॅकमेल करायचं थांबवलं नाही. आरोपींनी पीडितेकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. 5 लाख रुपयांची पूर्तता करून न शकल्यानं आरोपीने तिचे अश्लील फोटो तिच्या भावाला आणि मित्रांना पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा-लव्ह, सेक्स, धोखा..! फेसबुकवरून प्रेम आणि व्हाट्सअपवरून तीन तलाक

यानंतर आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसहित 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित दोन महिला पीडितेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होत्या, असं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिसांकडून केला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 10:45 AM IST

ताज्या बातम्या