Home /News /pune /

लव्ह सेक्स और धोका.. पुण्यात त्याने फेसबुकवर अपलोड केले मैत्रिणीचे नग्न फोटो

लव्ह सेक्स और धोका.. पुण्यात त्याने फेसबुकवर अपलोड केले मैत्रिणीचे नग्न फोटो

पीडित तरुणी आणि आरोपी सुनील बांबू याची भेट पहिल्यांदा मुंबईत झाली. पहिल्या भेटीच दोघांमध्ये मैत्री झाली.

    पुणे,5 नोव्हेंबर: सुसंस्कृत समजल्या पुण्यात असंस्कृत घटना समोर आली आहे. फेसबुकवर फेक अकाउंट बनवून त्यावर एका भामच्याने मैत्रिणीचे विवस्त्र फोटो अपलोड केले आहेत. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बांबू असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे. चाकण पोलिस त्याचा शोध घेत आहेत. काय आहे हे प्रकरण? पीडित तरुणी आणि आरोपी सुनील बांबू याची भेट पहिल्यांदा मुंबईत झाली. पहिल्या भेटीच दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर काही महिन्यांत आरोपी पिंपरी-चिंचवड येथे तरुणीला भेटायला आला. त्यावेळी आरोपीने फेसबुकवर तरुणीच्या नावाने फेक अकाऊंट बनवले. या अकाउंटवर सुनीलने तरुणीचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून वापरला होता. याच अकाऊंटवरुन त्याने पीडितेचे काही नग्न फोटो अपलोड केले. तसेच 'मी देहविक्री करते' अशी पोस्टही त्याने या अकाउंटवरुन केली होती. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी 21 वर्षांची असून तिने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. सुनील बांबू याच्याविरोधात चाकण पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी अ‍ॅक्ट) गुन्हा नोंदवला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कोणीही आपले खासगी फोटो इतर कोणाला पाठवू नयेत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी केले आहे. सुनील गुजरातला पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अलिकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. तरुणींनी कोणाशी मैत्री करताना याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केली आहे. शिवसेनेबद्दल शरद पवारांचं सूचक विधान, UNCUT पत्रकार परिषद
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: #Pune, Facebook, FACEBOOK FRIEND, Pune crime, Pune police

    पुढील बातम्या