दात तुटेपर्यंत भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

दात तुटेपर्यंत भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील अनेकजण जबर जखमी झाले आहेत. जुन्नर पोलिसात दोन्ही गटाच्या 17 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे.

  • Share this:

जुन्नर, 03 नोव्हेंबर : पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात (Junner) जमिनीच्या वादातून सावरगाव इथे सख्या चुलत भावानेच भावाला ट्रॅक्टरखाली चिरडून मारले असताना अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत इस्टेट एजंट, बांधकाम व्यावसायिकासह एका ज्येष्ठ वकील व भाजप पदाधिकाऱ्यावर फ्री स्टाईल हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील पाडळी गावात जमिनीच्या वादातून इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिक संतोष कबाडीसह 17 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जुन्नर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील आणि जुन्नर शहर भाजप अध्यक्ष गणेश बुट्टे यांचाही समावेश आहे.   ज्येष्ठ वकील राजेंद्र बुट्टे यांचे या हाणामारीत समोरचे दोन दात तुटले असून दोन्ही गटातील अनेकांना डोक्यात व हाता पायांना जबर मारहाण झाली आहे.

ठाकरे सरकारचा डाव तर नाही ना? मेट्रो कारशेडवरून भाजप नेत्याची सडकून टीका

शेतातील माल करण्यासाठी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी  पोकलंडच्या सहाय्याने काम सुरू होते. त्यावेळ हे सगळे आरोपी  तिथे आले. त्यानंतर शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही गट  एकमेकांना भिडले आणि फ्री स्टाईल हाणामारी करत शिवीगाळ करून लोखंडी कुर्‍हाडीने  एकमेकांना मारले.  यात हाताने व लाथा बुक्क्यांनीही एकमेकांना मारहाण केली. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील अनेकजण जबर जखमी झाले आहेत.  जुन्नर पोलिसात दोन्ही गटाच्या 17 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे.

शिवीगाळ केल्यानंतरही त्याला पाठिशी घातलं; प्राजक्ता गायकवाडचा खुलासा

परस्पर विरोधी तक्रारीत एका बाजूला  इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिक असलेल्या संतोष कबाडीसह आशुतोष संतोष कबाडी, प्रतिक विजय नलावडे, प्रणित विजय नलावडे, सुरेंद्र श्रीराम कबाडी, अनिता संतोष कबाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूने भाजप शहर अध्यक्ष  गणेश प्रल्हाद बुट्टे यांच्यासह आकाश धनंजय बुट्टे, रोहन सुभाष बुट्टे, रोहित जना बुट्टे, शैलेश शरद बुट्टे, प्रल्हाद शंकर बुट्टे, राजेंद्र शरद बुट्टे, शरद शंकर बुट्टे,आप्पासाहेब शंकर बुट्टे, प्रतीक जना बुट्टे, सुमित्रा गणेश बुट्टे सर्व राहणार कबाडवाडी हे आरोपी आहेत.

जुन्नर पोलीस स्टेशनचे  सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे व पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे  पुढील तपास करत आहेत.

Published by: sachin Salve
First published: November 3, 2020, 2:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या