मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune News: गलेलठ्ठ परताव्याचं आमिष दाखवून 32 कोटींची फसवणूक; अभियंता दाम्पत्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

Pune News: गलेलठ्ठ परताव्याचं आमिष दाखवून 32 कोटींची फसवणूक; अभियंता दाम्पत्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

Money Fraud in Pune: ब्रिटनमधील एका कंपनीत गुंतवणूक केल्यास तब्बल पावणे तीनशे टक्के परतावा (Offering lucrative returns) मिळेल, असं आमिष दाखवून पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाची तब्बल 32 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs 32 crore) केली आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 28 मे: ब्रिटनमधील एका कंपनीत गुंतवणूक केल्यास तब्बल पावणे तीनशे टक्के परतावा (Offering lucrative returns) मिळेल, असं आमिष दाखवून पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाची तब्बल 32 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs 32 crore) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात पुण्यातील आरोपी अभियंता दाम्पत्यासह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अभिजित संजय कुलकर्णी, त्याची पत्नी, अनिकेत कुलकर्णी, नितीन पाष्टे आणि आणखी एक महिला अशा पाच जणांविरोधात डेक्कन पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर हेमंत गुजराथी (वय- 50) असं फिर्यादी व्यक्तीचं नाव आहे. फिर्यादी गुजराथी हे पेशाने व्यावसायिक असून चाकण परिसरात त्यांची स्वतःची कंपनी आहे. आरोपींनी फिर्यादी गुजराथी यांची ऑक्टोबर 2018 पासून फसवणूक केली असून आतापर्यंत तब्बल 32 कोटी रुपये लाटले आहेत.

आरोपी अभिजित कुलकर्णी आणि त्यांची पत्नी दोघंही संगणक अभियंता आहेत. त्यांनी काही काही वर्षांपूर्वी वेल्थ प्लॅनेट लि. (ब्रिटन) नावाची  कंपनी सुरू केली होती. ही कंपनी कमोडीटी, शेअर आणि सोने चांदी बाजाराशी संबंधित क्षेत्रात काम करत होती. अभिजित हा या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता. तर पाष्टे हा एका विभागाचा प्रमुख होता.

हे वाचा-सरकारी जमीन विकून लाटले जवळपास 16 लाख; पुण्यातील भाजपच्या नगरसेवकाचा प्रताप

एका व्यक्तीच्या माध्यमातून आरोपींनी फिर्यादी हेमंत गुजराथी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर आरोपींनी फिर्यादी गुजराथी यांना ब्रिटनमधील एका कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास तब्बल 270 टक्के परतावा मिळेल असं आमिषही आरोपींनी गुजराथी यांना दाखवलं. त्यानंतर आरोपींनी गुजराथी यांच्याकडून ऑक्टोबर 2018 पासून तब्बल 32 कोटी रुपये लाटले आहेत. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचं कळताचं फिर्यादी हेमंत गुजराथी यांनी डेक्कन पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Money fraud, Pune