मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं फसवणूक; पुण्यातील वृद्धाला 11 लाखांचा गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं फसवणूक; पुण्यातील वृद्धाला 11 लाखांचा गंडा

Crime in Pune: शेअर बाजारातील (Stock market) गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष (Lure of big profit) दाखवत पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची 11 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 25 जुलै: शेअर बाजारातील (Stock market) गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष (Lure of big profit) दाखवत पुण्यातील (Pune) एका ज्येष्ठ नागरिकाची 11 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकानं समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. आरोपींनी ऑनलाइन पद्धतीनं गंडा (Online fraud) घातला आहे. त्यामुळे आरोपींना शोधून काढणं पोलिसांसमोर आव्हान आहे. गुन्हे शाखेचे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी एका अज्ञात महिलेनं फिर्यादीच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. समोरील महिलेनं आपण एक्सलेंसा ऑप्शन ऑनलाइन ट्रेडिग कंपनीकडून बोलत असल्याची माहिती दिली. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असं आमिष दाखवण्यात आलं. फिर्यादीनं सुरुवातीला काही रक्कम गुंतवणूक केल्यास आरोपींनी 35 लाख रुपयांचा नफा झाल्याचं एका संदेशद्वारे भासवलं. यानंतर आणखी रक्कम गुंतवल्यास आणखी फायदा होईल, असं आमिष दाखवलं.

हेही वाचा-न्यायासाठी लढणाऱ्यांसोबत धोका; पदवी नसतानाही वकिली करणाऱ्या महिलेचं फुटलं बिंग

याशिवाय आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी परतावा म्हणून फिर्यादीच्या खात्यात 1 लाख 12 हजार 620 रुपये पाठवले. भरघोस नफा मिळत असल्याचं लक्षात आल्यानंतर, आरोपींनी फिर्यादीला आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. दरम्यानच्या काळात आरोपींनी वेळोवेळी फिर्यादीकडून 11 लाख 24 हजार 434 रुपये ऑनलाइन पद्धतीनं घेतले.

हेही वाचा-ती क्लिप माझ्याकडे आहे, अटक टाळायची असल्यास 2कोटी दे;लाचखोर पोलिसाला रंगेहाथ अटक

पण काही दिवसांतच आरोपींनी फिर्यादीला परतावा देणं बंध केलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, पीडित ज्येष्ठ नागरिकांनं पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक उल्हास कदम करत आहेत. संबंधित आरोपींनी अशाच पद्धतीनं अनेकांना गंडा घातला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. विविध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अशा पद्धतीनं दिलेल्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Crime news, Financial fraud, Pune, Stock Markets