मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात थेट म्हाडालाच गंडवलं; देशपांडे आणि गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुण्यात थेट म्हाडालाच गंडवलं; देशपांडे आणि गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणात म्हाडानेच गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात म्हाडानेच गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात म्हाडानेच गुन्हा दाखल केला आहे.

पुणे, 9 डिसेंबर : बांधकाम व्यावसायिकांनी शासकीय योजनांचा फायदा घेत असताना बांधत असलेल्या प्रकल्पांमधील काही सदनिका या मध्यमवर्गीयांसाठी राखून ठेवायच बंधन राज्य सरकारने घातलं आहे. त्यासाठी त्यांना अतिरिक्त एफएसआय वापरण्याची परवानगीही देण्यात येते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या सदनिका म्हाडा (MHADA Pune) मार्फत सर्वसामान्य अर्जदारांना सोडत पद्धतीने दिल्या जातात. अशाच प्रकारच्या एका प्रकल्पामध्ये तब्बल 54 सदनिका पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अग्रीम गोयल यांनी म्हाडाला सादर केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या सदनिका म्हाडाच्या ताब्यात देण्यातच आल्या नाहीत, असं वृत्त समोर आलं आहे. म्हाडाने सोडत पद्धतीने या 54 सदनिका वितरित केल्यानंतर चार ते पाच वर्षे या सदनिका अर्जदारांना देण्यात आल्या नाहीत. अखेर या सगळ्या फसवणुकी बाबत म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी अग्रीम गोयल आणि त्यांचे आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. थेट म्हाडानेच बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. धानोरी येथील सर्व्हे क्रमांक २४/१/२/३/४/५/१०  व सर्व्हे क्रमांक ६७ / १ बी /१० या मिळकतीवर ईडब्लूएस व एलआयजी धारकांसाठी ५६ सदनिकांची स्वतंत्र योजना उभारली. गोयल यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत, म्हाडासाठी योजना राबवत असताना बांधकामाच्या बदल्यात अधिकचा एफएसआयचा वापरला. याबाबत म्हाडाच्या कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र, हमीपत्र देत म्हाडासह ५६ सदनिका धारकांची फसवणूक केली. शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे याने खोटे व रचनात्मक बिल्डिंग प्लॅन तयार केले, हे खोटे प्लॅन  म्हाडाकडे  सादर करत ते मंजूर करून घेतले, असाही आरोप लावला जात आहे. त्यामध्ये बिल्डरने तब्बल ५६ सदनिका धारकांची फसवणूक केली आहे. हे ही वाचा-Pune: महिला आणि लहान मुलांकडून घरफोडी, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद याप्रकरणी पुणे म्हाडाने बांधकाम व्यावसायिक अग्रिम गोयल व आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या मुख्य उपभियंता आशा हेमंत भोसले यांनी गोयल व देशपांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातल्या नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर हा गुन्हा दाखल झाल्याने आणि त्यातही म्हाडा सारख्या निमशासकीय संस्थेने हा गुन्हा दाखल केल्यामुळे ज्या 54 सदनिकाधारकांवर अन्याय झाला होता, आणि त्यांना किमान न्याय मिळेल अशी आशा आहे याचे कारण या घरांत पोटी त्यांनी गुंतवलेल्या लाखो रुपयांचं काय होणार याची चिंता त्यांना सतावते आहे.
First published:

Tags: Crime news, Mhada lottery, Pune

पुढील बातम्या