• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • चितळे दुधात काळा पदार्थ सांगत ब्लॅकमेल; 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या शिक्षक महिलेसह चौघांना अटक

चितळे दुधात काळा पदार्थ सांगत ब्लॅकमेल; 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या शिक्षक महिलेसह चौघांना अटक

प्रसिद्ध चितळे दुधामध्ये (Chitale Milk) काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत एफडीए (FDA) कडे तक्रार न करण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:
पुणे, 19 जून : प्रसिद्ध चितळे दुधामध्ये (Chitale Milk) काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत एफडीए (FDA) कडे तक्रार न करण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या चार जणांमध्ये एका शिक्षक महिलेचाही समावेश आहे. महिला पुण्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. दुकान बंद करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांनी ही खंडणी मागितली होती. शिक्षक असलेल्या पूनम परदेशी यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांच्यावर ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेलद्वारे आणि प्रत्यक्ष फोनद्वारे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ आढळला असल्याची तक्रार केली होती..यासाठी तुमच्या विरोधात एफडीए व पोलिसांकडे तक्रार करते. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, नाहीतर तुमचे दुकान बंद करू, तुमची बदनामी करू, अशा धमक्या देत सुरुवातीला 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. हे वाचा - ऑनलाइन क्लासमध्ये प्रायव्हेट पार्ट दाखवित होता विद्यार्थी; मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर सांगितलं धक्कादायक कारण दरम्यान, या सर्व प्रकारानंतर चितळे डेअरीकडून या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. यातील आरोपी महिलेची माहिती काढली असता ती एका नामांकित शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर आली. तसेच ही महिला चितळे दूधही वापरत नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना पकडण्यासाठी सापळा रचला. दरम्यान, चितळे डेअरीवाले 5 लाख रुपये देण्यासाठी तयार झाल्याचे पाहून त्यांनी ही रक्कम वाढवून 20 लाखांवर नेली. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना पकडण्यासाठी बनावट नोटांचे बंडल तयार केले आणि या नोटा स्वीकारताना चारही जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत श्रीनिवास घाडगे पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा यांनी माहिती दिली.
Published by:News18 Desk
First published: