जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Maharashtra Politics : 'शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची शरद पवारांच्या भेटीसाठी धडपड पण..., अमोल कोल्हेंचा दावा

Maharashtra Politics : 'शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची शरद पवारांच्या भेटीसाठी धडपड पण..., अमोल कोल्हेंचा दावा

(अमोल कोल्हे)

(अमोल कोल्हे)

‘शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिलं तरीसुद्धा त्यांच्या अडचणीच्या काळात,त्यांच्या कठीण काळात त्यांची साथ सोडून आपण स्वार्थासाठी निघून गेलात’

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

रायचंद शिंदे, प्रतिनिधी शिरुर, 06 जुलै : राज्यातील सत्तांतरानंतर शिरुर लोकसभेच्या आजी-माजी खासदारांनी एकमेकांवर चांगलीच चिखलफेक सुरू केली आहे. अभिनयातून वेगवेगळी पात्र आणि भूमिका बदणारे कोल्हे जनतेच्या मनातून उतरले आहे, असा टोमणा माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी मारलाय तर आढळराव पाटलांच्या विधानावर कोल्हेंनी पलटवार करत चांगलाच समाचार घेतला आहे. तुम्ही अडचणीच्या काळात उद्धव ठाकरेंची साथ सोडली, तसं मी नाही केलं, असं म्हणत आमचे छंद चार चौघात उथळमाथ्याने सांगतोय तसं तुमचे छंद काय? असा सवाल सुद्धा कोल्हेंनी उपस्थित केला. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बदलत्या राजकीय समीकरणावर बोलताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा News18 लोकमतशी बोलताना चांगलाच समाचार घेतला. ‘आज माझ्या दृष्टीने माझी उमेदवारी, माझी खासदारकी, माझं तिकीट हे प्रश्न फारसे महत्त्वाचे नाही. 4 वर्ष डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जनतेशी सरळ सरळ फसवणूक केली. काय केलं त्यांनी 4 वर्षात? मी जे शिजवून ठेवलं तेच त्यांनी केलं, असा टोमणाही मारला.

News18लोकमत
News18लोकमत

आढळराव पुढे म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वे कधीच होणार नाही असं म्हणणारे कोल्हे आता बोलू लागलेत.लोकसभेत बोलले म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. समोरा-समोर या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आणि माझ्या व जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असं सांगत आढळराव यांनी थेट कोल्हेंना आव्हान दिलं आहे. (raj Thackery : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, वर्षा बंगल्यावरचे PHOTOS) ‘तुम्ही बैलगाडा शर्यतीसाठी काय केलं? जे केलंय ते राज्य सरकारनं केलं आहे. जे केलं ते राज्य सरकारच्या कायदा व पशुसंवर्धन विभागाने केलं आहे. बैलगाडा शर्यतीसाठी कोणी श्रेय घेण्याचं कारण नाही. अगदी मी सुद्धा घेत नाही. मात्र कोल्हे सगळीकडे सांगत सुटलेत की मी हे केलं, मी ते केलं. कोल्हे कधीच मतदार संघात नसतात. त्यांची मतदार संघात कामे नाहीत. यामुळे लोक नाराज आहेत, चिडून आहेत. कोल्हे यांनी पंधरा वर्षातली माझी कारकीर्द पहावी. मी लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. तुम्ही काय केलं? संसदेत तुम्ही 58% च्या वर सहभागी नाहीत. नाटकी भाषेत भाषण केली का सगळं योग्य होत नाही. परवा अजितदादा बरोबर कोल्हे शपथविधीला गेले आणि नंतर शरद पवार गटात सामील झाले आणि माझं मनाचं द्वंद्व झालं वगैरे नाटकी भाषेत सांगतात. हे एखाद्या चांगल्या लेखकाच्या नाटकात डायलॉग शोभतात. पण, वस्तुस्थिती तशी नव्हती. राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजितदादांच्या शपथविधीला गेलते ते काय वडापाव खायला गेले नव्हते ना? असा सवाल करत आढळराव यांनी अमोल कोल्हे यांचा चांगला समाचार घेतला. शपथविधीनंतर तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्या पायाला स्पर्श करून मिठी मारता, जोरजोरात हसता ही सगळी बनवाबनवी आहे, असाही टोमणा आढळराव यांनी मारला. अमोल कोल्हे यांचा पलटवार ‘आढळराव पाटील आता शरद पवारांच्या भेटीसाठी धडपड करत असल्याचा दावा कोल्हेंनी करत शरद पवारांच्या दरवाजाची किल्ली माझ्यात हातात असल्याचेही स्पस्ट करत करारा जबाब दिला. वैयक्तिक टीकेला मी महत्व देत नाही असं सांगत कोल्हे सुद्धा चांगलेच आक्रमक झाले. ‘माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होणारे वक्तव्य आढळराव करत आहेत त्यामुळे त्याला उत्तर देणे क्रमप्राप्त आहे. आढळराव यांच्या वयाचा आदर राखत मी त्यांना काही मूलभूत गोष्टी निदर्शनास आणून देऊ इच्छित आहे असं सांगत,2004,2009,2014, 2019 अशा चार-चार वेळा आपल्याला लोकसभेचे तिकीट शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी आपल्याला दिलं तरीसुद्धा त्यांच्या अडचणीच्या काळात,त्यांच्या कठीण काळात त्यांची साथ सोडून आपण स्वार्थासाठी निघून गेलात. 2019 मध्ये एकदाच शरद पवार साहेबांनी मला तिकीट दिलं. आज अडचणीच्या काळात मी ठामपणे त्यांच्यासोबत उभा आहे. हा आपल्या दोघांमधला मूलभूत फरक आहे असा टोमणाही मारला. (Maharashtra Politics : सत्ताधारी-विरोधकांच्या फोडाफोडीत ठाकरेंकडून मित्राचाच गेम? काँग्रेस आमदार मातोश्रीवर!) अभिनयावर केलेल्या टीकेला उत्तर देताना कोल्हे म्हणाले की, अभिनय हा माझ्या चरितार्थाचे साधन आहे. माझी अमेरिकेत कुठलीही कंपनी नाही आणि तसा मी माझ्या अभिनयातून कोणताही फायदा करून घेतला नाही. मतदार संघातील सर्व कामाचे श्रेय आपण घेणार असाल तर त्या साठी ते 15 वर्षात का झालं नाही? असं म्हणत आधी लोकसभेची उमेदवारी तर जाहीर होऊ द्या मग बोलू. शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत आजवर आपल्याला उमेदवारी दिली तर आपण खासदार होता मात्र आपले आमदार मात्र निवडून येत नाहीत. याला दोन अपवाद आहेत अन्यथा 15 वर्षात आपली खालची पाटी कोरी आहे. आपल्याला लोकांनी नाकारले आहे. त्यामुळे सुसंस्कृत बोला. आपल्या सारख्या नेत्याने अस बोलू नये. आपला या बोलण्यात संधीसाधू वाटता. 2014 ला मी आपला प्रचार केला याबद्दल वाईट वाटलं, अस सांगत कोल्हेंनी पाटलांना टोला लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात