झुंज अपयशी, शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचं कोरोनामुळे निधन

झुंज अपयशी, शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचं कोरोनामुळे निधन

सुरेश गोरे हे माजी खासदर शिवाजी आढळराव, महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते.

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर : शिवसेनेचे खेड-आळंदी विधानसभेचे माजी व प्रथम आमदार सुरेश गोरे(वय 57)यांचे आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.

सुरेश गोरे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर मागील 20  दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या लढाईत आज त्यांना अपयश आले. त्यांच्या शांत, मनमिळाऊ व संयमी स्वभावामुळे त्यांनी राजकारण व समाजकारणात वेगळं ठसा उमटवला होता.  तालुक्यात सुरेश गोरे यांनी भाऊ या नावाने आपली ओळख निर्माण केली होती.

संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत होणार अनलॉक, राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या गोरे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवले होते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले होते. राजकीय गणिताच्या समीकरणात सुरेश गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी तीस हजारांवर मतांनी रोगे यांनी दिलीप मोहिते पाटील यांचावर मात केली होती. त्यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली.

विरोधकांवरही संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा. कार्यकर्त्यांच्या कायम गराड्यात असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड  गेल्याने खेड तालुक्याला धक्का बसला असून मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. सुरेश गोरे हे माजी खासदर शिवाजी आढळराव, महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात चाकणला सुरेश गोरे यांच्या प्रचारानिमित्त उद्धव ठाकरे 2 वेळा प्रचारासाठी उपस्थित राहिले होते.

HAL हेरगिरी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला दीपक!

सुरेश गोरे यांच्या मागे, आई, पत्नी 1 मुलगा,मुलगी भाऊ बहीण चुलते, पुतणे असा मोठा आणि एकत्रित कुटुंब असेला मोठा परिवार आहे. सेनेच्या सर्वच नेत्यांमध्ये सुरेशभाऊंच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 10, 2020, 11:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या