बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांची भीमा नदीत उडी मारून आत्महत्या

बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांची भीमा नदीत उडी मारून आत्महत्या

सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या खेड तालुक्यातील पायाभरणीत देखील त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.

  • Share this:

पुणे 16 जून: जिल्ह्यातील खेड तालुक्यातील  राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातले ज्येष्ठ वकील चंद्रशेखर कोंडीभाऊ टाकळकर यांनी आत्महत्या केली आहे. ते गेली 30 वर्ष या व्यवसायात आहेत. त्यांनी आज मंगळवारी दुपारी भीमा नदीत केदारेश्वर येथील बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ते राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या खेड तालुक्यातील पायाभरणीत देखील त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. ते अतिशय अभ्यासू, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. तसेच समाजकारण व राजकारणात त्यांचा वावर असे.

त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने वकिली क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे.

हे वाचा -

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण का वाढलं? सरकारने दिलं स्पष्टीकरण

70 वर्षांच्या महिलेने 100 वर्षांच्या आईला खाटेसह नेलं खेचून; अवघ्या 1500 रुपयांस

"सुशांत करू शकतो तर मी का नाही", सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्यानेही घेतला गळफास

First published: June 16, 2020, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading