Home /News /pune /

'काय होतास...' माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा VIDEO व्हायरल

'काय होतास...' माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा VIDEO व्हायरल

पुण्यात एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे, 16 डिसेंबर : या ना त्या वादामुळे कायम चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (harshvardhan jadhav)यांना पुण्यात एका व्यक्तीला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडीओसमोर आला आहे. टी-शर्ट फाटलेल्या आणि दयनीय अशा अवस्थेतला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यात एका दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अमन अजय चड्डा यांनी फिर्याद दिली होती. किरकोळ अपघाताच्या वादातून जाधव यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप अमन अजय चड्डा यांनी केला आहे. त्यानंतर त्यांना  त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 18 तारखेला परत या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यावेळी हर्षवर्धन जाधव न्यायालयासमोर बाजू मांडताना म्हणाले की, आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने झाली आहे. माझी सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो होतो. तेव्हा फिर्यादीने दोघांचे अपहरण आणि मारहाण केली. तसंच पोलीस आपली तक्रारच घेत नसल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्याच बरोबर मारहाणीची ही घटना सोमवारी घडलेली असताना हा गुन्हा मंगळवारी संध्याकाळी दाखल झाला आणि त्यामागे राजकीय हात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. काय आह प्रकरण? पुण्यात औंध भागात हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडताच रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धक्का लागून इजा झाली होती. याचा जाब विचारताच हर्षवर्धन जाधव यांनी दाम्पत्याला मारहाण केली होती. त्यानंतर ते पसार झाले. मात्र पुढं जाऊन त्यांच्या वेगवान गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले. त्या ठिकाणी मात्र नागरिकांनी हर्षवर्धन यांना चोपले होते. त्यानंतर  अमन अजय चड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. हर्षवर्धन जाधवांची वादग्रस्त कारकीर्द हर्षवर्धन जाधव यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. मनसेकडून आमदार झालेल्या जाधव यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तिथंही मतभेद झाल्यानंतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. हर्षवर्धन जाधव हे त्यांच्या कौटुंबिक कलहामुळेही कायम चर्चेत असतात. सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर आगपाखड करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या