माजी नगरसेविकेच्या पतीची ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यात खळबळ

माजी नगरसेविकेच्या पतीची ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यात खळबळ

जयंत राजपूत यांचे लॉ कॉलेज रोडवर कार्यालय आहे. बुधवारी मध्यरात्री त्यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Share this:

पुणे, 29 ऑक्टोबर : पुणे महापालिकेच्या ( Pune Municipal Corporation) स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीता परदेशी-राजपूत (neeta Pardeshi) यांचे पती जयंत राजपूत (Jayant Rajput ) यांनी आपल्या कार्यालयात गळफास ( commits suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  जयंत राजपूत यांच्या आत्महत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

जयंत राजपूत यांचे लॉ कॉलेज रोडवर कार्यालय आहे. बुधवारी मध्यरात्री त्यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेसकडून नवीन नावं समोर, काहींना मिळणार डच्चू?

जयंत राजपूत यांच्या पत्नी नीता परदेशी यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्याचबरोबर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवले होते. जयंत राजपूत यांची बारामतीमध्ये औषध कंपनी आहे.

शरद पवार राज्य चालवतात, उद्धवांना बोलून काही उपयोग नाही, चंद्रकांतदादांचा टोला

बुधवारी रात्री जयंत राजपूत हे काही कामानिमित्ताने ऑफिसमध्ये थांबले होते. रात्री उशिरापर्यंत ते कार्यालयातच होते. वडील घरी न आल्यामुळे त्यांच्या मुलाने कार्यालयात जाऊन पाहणी केली असता जयंत राजपूत यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने डेक्कन पोलिसांना देण्यात आली. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

जयंत राजपूत हे मनमिळावू स्वभावाचे होते, ते इतरांना समुपदेशन करत होते. जयंत राजपूत यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: sachin Salve
First published: October 29, 2020, 1:54 PM IST

ताज्या बातम्या