धक्कादायक, पुण्यातील भाजपच्या माजी आमदाराला आणि मुलालाही कोरोनाची लागण

धक्कादायक, पुण्यातील भाजपच्या माजी आमदाराला आणि मुलालाही कोरोनाची लागण

योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.

  • Share this:

 

पुणे, 05 जुलै : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.

'दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला' असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं.

तसंच, 'माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.' असं आवाहनही त्यांनी केलं.

भाजपची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये टिळेकर यांची ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

औरंगाबादकरांसाठी मोठी बातमी, पालिका आयुक्तांनी दिले महत्त्वाचे संकेत

दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ हे अनेक ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र, आता महापौरांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत त्यांनी कालच 4 जुलै रोजी स्वत: ट्वीट करत माहिती दिली.

सुनेच्या घरी जात असताना काळाचा घाला, मुलासह आई-वडील कार अपघातात जागीच ठार

'थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील', असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केले.

संपादन - सचिन साळवे

First published: July 5, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या