मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'श्रीकृष्ण-हनुमान भारताचे महान..' परराष्ट्रमंत्र्यांचं पुण्यात मोठं वक्तव्य, म्हणाले..

'श्रीकृष्ण-हनुमान भारताचे महान..' परराष्ट्रमंत्र्यांचं पुण्यात मोठं वक्तव्य, म्हणाले..

परराष्ट्रमंत्र्यांचं पुण्यात मोठं वक्तव्य

परराष्ट्रमंत्र्यांचं पुण्यात मोठं वक्तव्य

श्रीकृष्ण आणि हनुमान हे भारताचे महान मुत्सद्दी होते, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्र्यांनी पुण्यात केलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 28 जानेवारी : 'श्रीकृष्ण आणि हनुमान हे भारताचे महान मुत्सद्दी होते. भगवान हनुमान तर मिशनच्या पलीकडे गेले. ते एक बहुआयामी मुत्सद्दी होते. धोरणात्मक संयमाचे मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण. महाभारताची कथा ही नियम मोडणाऱ्यांची कथा आहे. पांडवांची प्रतिष्ठा कौरवांपेक्षा चांगली होती', असं वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुण्यात केलं. यावेळी मंत्री जयशंकर यांनी नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा साधला. चिनी सैनिकांच्या घुसखोरी संबंधित प्रश्नावर त्यांनी मोठे विधान केले. परराष्ट्र मंत्री म्हणाले, 'कोणत्याही जमिनीबद्दल बोलायचे झाले तर ही जमीन 1962 मध्ये चीनने बळकावली होती, हे विरोधक तुम्हाला सांगत नाहीत, ते काल घडलंय असं दाखवत आहे.' पुणे येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

विरोधकांचा खरपूस समाचार घेत परराष्ट्रमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राहुल गांधी आणि चीनचे राजदूत यांच्यातील कथित संपर्काच्या मुद्द्यावरही जयशंकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'माझ्या विचारात कमतरता असेल तर मी माझ्या सैन्याशी किंवा गुप्तचरांशी बोलेन. मी चीनच्या राजदूताला फोन करून विचारणार नाही.

वाचा - भाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा? 'हे' तर कारण नसावं?

ऑस्ट्रिया दौऱ्यावर परराष्ट्रमंत्र्यांनी केलं होतं मोठं वक्तव्य

ऑस्ट्रिया दौऱ्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करताना दहशतवादाचे केंद्र भारताच्या अगदी जवळ असल्याचे म्हटले होते. पाकिस्तान हा तोच देश आहे, ज्याने मुंबईवर हल्ला केला होता. हॉटेल्स आणि परदेशी पर्यटकांवर हल्ले केले. सीमेपलीकडून दररोज दहशतवाद्यांना पाठवत आहेत. दहशतवादाबाबत कठोर भूमिका मांडताना ते म्हणाले होते की, मला हवे असते तर मी दहशतवादाच्या या केंद्रापेक्षाही कठोर शब्द वापरू शकलो असतो. आपल्यासोबत काय घडत आहे, हे लक्षात ठेवून एपिसेंटर हा एक अतिशय ड‍िप्‍लोमेट‍िक शब्द आहे.

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पीओ यांनी त्यांच्या 'नेव्हर गिव्ह एन इंच: फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' या पुस्तकात भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर चुकीची टिप्पणी केली आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पुस्तकातील अपमानास्पद शब्दांचा तीव्र निषेध करतो असे म्हटले होते. या पुस्तकात जयशंकर यांची प्रशंसा करण्यात आली असली तरी.

First published:

Tags: Pune