Home /News /pune /

घरापायी भाऊ रक्ताचं नातं विसरला, बहिणीला दिले पेटवून, पुण्यातील घटना

घरापायी भाऊ रक्ताचं नातं विसरला, बहिणीला दिले पेटवून, पुण्यातील घटना

 फ्लॅट नावावर करण्यावरून आरोपी शरद आणि राजश्री यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

फ्लॅट नावावर करण्यावरून आरोपी शरद आणि राजश्री यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

फ्लॅट नावावर करण्यावरून आरोपी शरद आणि राजश्री यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

    पुणे, 26 सप्टेंबर :  वडिलांच्या संपत्तीतून वाटा मिळावा यासाठी  भावा-भावांमध्ये (brother ) वादाच्या घटना नेहमी घडत असतात. पुण्यात अशाच एका वादातून सख्या मोठ्या बहिणीला (sister) पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील औंधममध्ये घडली. जखमी महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील औंध तालुक्यातील अनुसया सोसायटीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे.  शरद मनोहर पतंगे (वय 45) असं या अटक करण्यात आलेल्या भावाचं नाव आहे. राजश्री मनोहर पतंगे ( वय 48) असं जखमी महिलेचं नाव आहे. राजश्री आणि शरद हे दोघेही सख्ख्ये भाऊ बहिण आहेत. दोघांना आणखी एक भाऊ आहे, असं वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे. माफी मागणारच नाही', महिलेला शिवीगाळ करणाऱ्या भाजप आमदारांचं उत्तर औंध परिसरात अनुसया हौसिंग सोसायटीमध्ये राजश्री पतंगे राहतात. त्यांचं लग्न झालं नाही. राहत असलेला फ्लॅट हा त्यांच्या आईच्या नावावर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आई आणि वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे फ्लॅट नावावर करण्यावरून आरोपी शरद आणि राजश्री यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी शरदने हा फ्लॅट आपल्या नावावर करून द्यावा अशी मागणी करत होता.  पण, राजश्री यांनी त्याला नकार दिला होता. शुक्रवारी दुपारी सुद्धा शरद हा दारू पिऊन राजश्रीच्या घरी आला होता. त्यावेळी राजश्री आणि शरदमध्ये पुन्हा एकदा फ्लॅट नावावर करण्यावरून वाद सुरू झाला.   त्याने पुन्हा एकदा फ्लॅट नावावर करून देण्यासाठी हट्ट धरला. पण राजश्री यांनी नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी शरद याने राजश्रीच्या साडीला आग लावून पेटवून दिले. सुदैवाने लहान भाऊ त्या ठिकाणी होता. त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, यात तोही होरपाळून गेला. पण, राजश्री यांच्या चेहरा आणि मानेपासून पायापर्यंत भाग भाजला आहे. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. CSIR Pune Recruitment: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे नोकरीची मोठी संधी या घटनेची माहिती मिळताच  चतुःश्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राजश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शरद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Pune, पुणे

    पुढील बातम्या