Home /News /pune /

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, या 4 अधिकाऱ्यांवर जबाबदारी

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, या 4 अधिकाऱ्यांवर जबाबदारी

निर्णय जलदगतिने व्हावेत, कामात सुसुत्रता यावी, समन्वय वाढाला यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

    मुंबई 27 एप्रिल: महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक वेगाने प्रसार होत आहे. तो प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी मदत करणार आहेत. निर्णय जलदगतिने व्हावेत, कामात सुसुत्रता यावी, समन्वय वाढाला यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पवार यांच्या कार्यालयाने म्हटलं आहे. अनिल कवडे,  सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे वाचा - कौतुकास्पद! जनतेची सुरक्षा करणाऱ्या मुंबई पोलिसांना अक्षय कुमारची 2 कोटींची मदत पुणे शहरात गेल्या 10-15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना इतर विकार आहेत ते व्यक्ती कोरोनाबाधित होऊन हा रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत होता. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत पुढाकार घेऊन झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आपण 350 टीम पाठवत आहोत,' अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. 'या टीमजवळ विविध संसाधने असतील. त्या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे जे आजार आहेत ते नियंत्रणाखाली आहेत की नाही हे तपासायचे आणि त्यांना जर कोरोनाची बाधा झाली असेल तर त्यांना वेगळं काढून त्यांच्यावर उपचार सुरू करायचे. सर्व नारिकांनी पुढे येऊन कोणाला लक्षण दिसत असतील तर कृपया याबाबत माहिती द्या. हे वाचा -  Coronavirus चा धोका : लिफ्ट आणि जिन्यांचा वापर करताना सावध राहा हे लपवू नका. आपलं सहकार्यच आम्हाला या रोगावर मात करण्यास मदत करू शकेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रोग जीवघेणा ठरत आहे, त्यामुळे नागरिकांनी कृपया पुढे या आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Ajit pawar

    पुढील बातम्या