भाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पण त्याआधी त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2018 12:24 PM IST

भाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

पुणे, 18 जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पण त्याआधी त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. त्याविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टाईलने आंदोलनं केली पण त्यांना खड्ड्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री देण्यात आली असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

भाजप विरोधात बसल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही थर्ड डिग्री द्यावी का, असा सवालही त्यांनी केला. दूध आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. महाराष्ट्र राज्य हे केंद्र सरकार चालवतंय, आणि त्यामुळे अमूलसारख्या गुजरातमधल्या कंपन्यांना महाराष्ट्रात मोकळं रान मिळावं, म्हणून हे सगळं सुरू आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारला स्वत:ची भूमिका नाही का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद

या पत्रकार परिषदेत राज यांनी नीट परिक्षेवरही भाष्य केलं. नीटच्या प्रवेश परीक्षेत महाराष्ट्राच्या मुलांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे, नाहीतर बाहेरून येणाऱ्या परीक्षार्थींवर आमची नजर असेल, असा धमकीवजा इशाराच राज ठाकरेंनी दिला. राज्य सरकारला मराठी भाषेबद्दल अभिमानच नाही अशी टीका करत राज यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठी मानसाच्या अस्मितेचा मुद्दा पुढे केला आहे. महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्या कधी मिळणार, महाराष्ट्रातील नागरिकांना प्राधान्य मिळणार आहे की नाही असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. बाहेरच्या राज्यांतल्यांना महाराष्ट्रात घुसवण्याचं काम सुरू आहे. पण सत्ता बदलते राहते. आज भाजप सत्ते आहे पण उद्या विरोधी पक्षात येतील असा विश्वासही राज यांनी या परिषदेत मांडला.

Loading...

हेही वाचा...

वाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले...!

Happy Birthday Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

श्रेयस तळपदे झाला तब्बल तीन मुलांचा बाप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...