पुण्याच्या 'येवलें'चा गोड चहा झाला कडू, FDAची कारवाई

अल्पावधीत चहा प्रेमींमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुण्यातील 'येवले चहा'विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FDA) कारवाई करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 08:40 PM IST

पुण्याच्या 'येवलें'चा गोड चहा झाला कडू, FDAची कारवाई

पुणे, 24 सप्टेंबर : अल्पावधीत चहा प्रेमींमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुण्यातील 'येवले अमृततुल्य चहा'विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FDA) कारवाई करण्यात आली आहे. या चहामध्ये मेलानाईटचा भरपूर प्रमाणात वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री इम्रान हवालदार आणि रमाकांत कुलकर्णी यांनी येवला फुड प्रॉडक्ट गोडाऊनमधील विक्रीसाठी पॅकबंद करून ठेवलेला चहा पावडर, साखर, टी मसाला यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. शिवाय यासंदर्भात प्रेस नोटदेखील जारी करण्यात आली आहे. तसंच सुमारे 6 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या उत्पादनांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक असणारी माहिती छापणं बंधनकारक आहे. पण जप्त केलेल्या पाकिटांवर कोणत्याही प्रकारचे लेबल आढळले नाही. त्यामुळे त्यात नेमका कोणता अन्न पदार्थ आहे, त्यात निश्चित कोणता घटक पदार्थ किती प्रमाणात आहेत याबाबतीची कोणतीही माहिती सर्वसामान्यांना देण्यात आलेली नव्हती.

(वाचा :कांद्यामुळे सप्टेंबरमध्येच का येतं डोळ्यात पाणी?)

धक्कादायक बाब म्हणजे अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत खातरजमा होण्यासाठी प्रयोगशाळेकडून तपासणीही केलेली नाही. शिवाय, येवले फुड प्रॉडक्टकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक असलेला परवानादेखील नसल्याचं तपासात चौकशीत आढळून आलं.

(वाचा : धक्कादायक! सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, परिसरात खळबळ)

ही सर्व माहिती हाती आल्यानंतर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून 'येवले चहा'ला त्यांचे उत्पादव आणि विक्री पुढील आदेश देईपर्यंत बंद ठेवण्यास बजावण्यात आलं आहे.

Loading...

(वाचा :अबब...भाव वाढताच चोरांनी मारला 27 क्विंंटल काद्यांवर डल्ला!)

काय आहे कायद्याचा उद्देश :

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 हा कायदा देशभरात 5 ऑगस्ट 2011पासून लागू करण्यात आला आहे. याचं प्रमुख उद्देश जनतेला सुरक्षित, सकस आणि निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे.

VIDEO : वंचितशी 'तलाक' घेणाऱ्या जलील यांना आली जाग, आता म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 08:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...