मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

खवय्या पुणेकरांसाठी Alert! New Year साजरं करण्यासाठी होम डिलिव्हरी पाहिजे तर हे आहेत नियम

खवय्या पुणेकरांसाठी Alert! New Year साजरं करण्यासाठी होम डिलिव्हरी पाहिजे तर हे आहेत नियम

नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून कोरोनाला (Coronavirus) प्रवेश करता येऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. नवे अतिरिक्त कडक नियम देशभरासह पुण्यातही लागू केले आहेत.

नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून कोरोनाला (Coronavirus) प्रवेश करता येऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. नवे अतिरिक्त कडक नियम देशभरासह पुण्यातही लागू केले आहेत.

नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या माध्यमातून कोरोनाला (Coronavirus) प्रवेश करता येऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. नवे अतिरिक्त कडक नियम देशभरासह पुण्यातही लागू केले आहेत.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 31 डिसेंबर : जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी (new year celebrations) सज्ज होत असतानाच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत (new strain of Coronavirus) बातम्या येऊ  लागल्या. सोबतच ब्रिटनमध्ये सापडलेला हा नवा स्ट्रेन जगभरात वेगानं पसरतो आहे. त्यामुळं विविध देश covid - 19 च्या नियमांना शिथिल न करता उलट अजूनच कडक करत आहेत. भारत आणि महाराष्ट्र राज्यही याला अपवाद नाही. पुणे महापालिकेने (Pune News) नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (31st December) काय नियम असतील याबाबत आदेश काढले आहेत.

नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या (new year celebration) नादात लोक नियमांचं उल्लंघन करत नाहीत न हे पहायला प्रशासन सज्ज आहे. पुणे महापालिकेच्या नियमावलीमुळे पुणेकरांना घरात बसूनच थर्टी फर्स्ट (31st) साजरा करावा लागणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. आणि तरीही वर्षाचा शेवटचा दिवस घराबाहेर साजरा करायचा असेल तर डेडलाईन असणार आहे पावणेअकरा.

विशेष म्हणजे, 31 डिसेंबरला हॉटेल्स आणि फूड होम डिलिव्हरी सुविधाही पावणेअकरा वाजताच बंद होणार आहे. कारण रात्री 11 वाजल्यापासून नाईट कर्फ्यू लागू होणार आहे.

यामुळं दरवर्षी मध्यरात्री 12 च्या ठोक्याला फर्ग्युसन रस्ता (एफसी रोड) , जंगली महाराज रस्ता (जेएम रोड) ,कॅम्प मधील महात्मा गांधी (एमजी रोड) रस्ता याठिकाणी होणारा हॅपी न्यू इयरचा तरुण जल्लोष यंदा दिसणार नाही. रात्री 11 नंतर कडक संचारबंदी लागू असल्याने आणि सोबत जमावबंदीही असल्याने 'घरी बसा सुरक्षित रहा' हाच संदेश पालिका, पोलीस प्रशासनाने पुणेकरांना दिला आहे.

थर्टी फर्स्टला लष्कर परिसरात महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड) बंद

- नवीन वर्षांच्या स्वागतासाठी लष्कर परिसरात महात्मा गांधी रस्त्यावर होणा-या गर्दीला टाळण्यासाठी हा रस्ता आज सायंकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

- या भागाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

चौकांत होणारी गर्दी टाळण्यासाठी देखील पोलिसांनी नियोजन केलं असून शहरातील वेगवेगळ्या भागातील 30 प्रमुख चौकातील सिग्नल रात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

- महात्मा गांधी रस्त्यावर पूलगेट परिसरातून येणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे.

- लष्कर भागातील इस्कॉन मंदिराकडून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

- इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

- सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे,

- वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. भरधाव वेगाने वाहनं चालवू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.

शिवाजीरस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद

नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे शुक्रवारी (ता. 1) शिवाजी रस्ता सकाळी सात वाजल्यापासून मोटारी तसेच चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून जाणा-या पीएमपी बस पर्यायी मार्गाने सोडण्यात येणार आहेत.

First published:

Tags: Coronavirus, New year, Pune