पिंपरी, 18 जुलै : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित केली आहे. पण, तरीही डॉक्टर सेवेवर रूजू होण्यास तयार नसल्याचं समोर आलं आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शंभर खासगी डॉक्टरांना महापालिका रुग्णालयात सेवा पुरविण्याच प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, डॉक्टर हजर होत नसल्याने त्यांना आता थेट नोटीसी बजाविण्यात आल्या आहेत. पुढील 24 तासात कामावर हजर न झाल्यास संबधित डॉक्टरांची नोंदणी रद्द केली जाईल अस नोटीसीद्वारे कळविण्यात आले आहे.
अख्खं गाव फक्त पाहत होतं, आणि 'ती' पतीचा मृतदेह हातगाडीवर ओढत नेत होती!
दरम्यान, आम्ही आमची सेवा पुरवायला तयार आहोत मात्र त्यासाठी आम्हाला योग्य मानधन, आणि विमा संरक्षणाची लेखी हमी देण्यात यावी अशी भूमिका नोटीसी बजाविण्यात आलेल्या डॉक्टरांच्या "निमा"संघटनेचे शहर सचिव डॉक्टर अभय तांबिले यांनी घेतली आहे.
त्यामुळे खासगी डॉक्टर आणि महापालिका प्रशासनातील वाद चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.
मी खासदार विनायक राऊतांचा मुलगा, बघून घेतो तुला? निलेश राणेंनी व्हिडिओ आणला समोर
दरम्यान, पुण्यात एकीकडे सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अतिसौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या तथापी, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे.
पुण्याच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या अधिकाऱ्याने दिले धडे, अजितदादांनी दिले आदेश
जे रुग्ण कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत आहेत आणि कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र असे रुग्ण घरी जाण्यास नकार देत असतील तर त्यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्यात यावी, असंही जिल्हाधिकारी राम यांनी कळवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.