पुणं तिथं काय उणं.. दिव्यांगांसाठी राज्यातलं पहिलं स्वतंत्र न्यायालय पुण्यात

पुणं तिथं काय उणं.. दिव्यांगांसाठी राज्यातलं पहिलं स्वतंत्र न्यायालय पुण्यात

राज्यभरात दिव्यांगाचे तब्बल 3 लाख खटले प्रलंबित आहेत.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे,(प्रतिनिधी)

पुणे,12 डिसेंबर: दिव्यांगांसाठी पुण्यात राज्यातलं पहिलं न्यायालय सुरू झालंय. दिव्यांग पक्षकार आणि ज्येष्ठ नागरिकांचे बहुतांश खटले या स्पेशल कोर्टात वर्ग करण्यात आले असून तिथं दिव्यांगासाठीच्या सर्व सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्यात. या दिव्यांग कोर्टासाठी स्वतंत्र न्यायाधिशांची नियुक्ती देखील करण्यात आलीय. कोर्टात गेल्यानंतर सर्वाधिक उपेक्षा कोणाची होत असेल तरी दिव्यांगांची आणि ज्येष्ठ नागरिकांची. कारण वर्षानुवर्षे कोर्टाच्या तारखावर तारखा पडत राहतात पण निकाल काही लागत नाही म्हणूनच 2016 च्या केंद्रीय दिव्यांग कायद्यानुसार सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र कोर्ट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्याच आदेशाची अंमलबजावणी म्हणून पुण्यात राज्यातलं पहिलं दिव्यांग कोर्ट स्थापन करण्यात आलंय.

पुणे जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्व खटले या तळमजल्यावरील कोर्टात वर्ग करण्यात आले असून तिथं रॅम्प. व्हिलचेअरसारख्या सर्व सुविधा देखील बार असोशिएशननं उपलब्ध करून दिल्यात.

दिव्यांगासाठीची ही कोर्ट राज्यभर स्थापित व्हावीत, यासाठी आरटीआय कार्यकर्ते शंकर साळवे हे दिव्यांग पक्षकार गेली दोन वर्षे शासनस्तरावर पाठपुरावा करत होते. पुण्यात दिव्यांग पक्षकारांसाठी स्वतंत्र न्यायालय सुरू झाल्याबद्दल दिव्यांग वकील निखिल बाजी यांनी समाधान व्यक्त केलंय.

राज्यभरात दिव्यांगाचे तब्बल 3 लाख खटले प्रलंबित आहेत. पण या स्पेशल पक्षकारांना स्वतंत्र न्यालालयेच उपलब्धच होत नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत होती. ज्येष्ठ नागरिकांच्याबाबतीतही हाच अनुभव आहे. म्हणूनच पुण्यात या वर्गासाठी विशेष न्यायालय स्थापन होणं नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. आता राज्यभरातही अशीच विशेष न्यायालयं स्थापित व्हावीत जेणेकरून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित खटले लवकर निकाली निघतील आणि त्यांना खऱ्याअर्थाने न्याय मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune court
First Published: Dec 12, 2019 10:02 PM IST

ताज्या बातम्या