पुणे हादरले! पोलीस आयुक्तालयाजवळच गोळीबार, 6 तासांमधली दुसरी हत्या

पुणे हादरले! पोलीस आयुक्तालयाजवळच गोळीबार, 6 तासांमधली दुसरी हत्या

हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. याच भागात अनेक आंदोलने होत असतात त्यामुळे तिथे कायम पोलीस बंदोबस्तही असतो. अशा भागातच ही घटना घडल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

पुणे 05 ऑक्टोबर: पुण्यात सोमवारी सकाळपासून घडलेल्या दोन घटनांनी शहर हादरून गेलं आहे.  सकाळी एका गुंडाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी पोलीस आयुक्तालयाच्या जवळच गोळीबार झाला. यात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर फैरी झाडून त्याची हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयही जवळच आहे.  त्याच कार्यालयातून ही व्यक्ती निघालेली होती. त्यानंतर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. याच भागात अनेक आंदोलने होत असतात त्यामुळे तिथे कायम पोलीस बंदोबस्तही असतो. अशा भागातच ही घटना घडल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले असून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळी काय घडलं?

शहरातील खराडी परिसरात एका मोकळ्या मैदानात कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

पुणे शहरातील खराडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास ही घटना  घडली.  शैलेश घाडगे (वय 33) असं खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे.

पुण्यात एकाच दिवशी घडले भयंकर, तीन घटना अन् चौघांचा गेला जीव

खराडीमधील नैवेद्यम हॉटेल शेजारी मोकळे मैदान आहे. आज सकाळी या मैदानावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे स्थानिकांना आढळून आले. स्थानिकांनी तातडीने याबद्दल चंदननगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाडगेचा असल्याचे समजले.  पोलिसांनी शैलेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

काँग्रेसने पाळला आघाडीचा धर्म अन् शिवसेनेनं निवडणूक जिंकली, भाजपचा पराभव

शैलेश घाडगे हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहेत. शैलेश घाडगेची कुणी आणि का हत्या केली याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. पूर्ववैमनस्यातून शैलेशची हत्या झाली असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चंदन नगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 5, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading