Home /News /pune /

Pune Breaking: पुण्यात कोथरूड मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी

Pune Breaking: पुण्यात कोथरूड मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी

Pune firing in Kothrud Metro Carshed: पुण्यातील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार झाला आहे.

पुणे, 26 ऑगस्ट : पुण्यात मेट्रो कारशेडमध्ये (Metro Car Shed) गोळीबार (Firing) झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुणे शहरातील (Pune City) कोथरूड येथील मेट्रो कारशेडमध्ये (Kothrud Metro Car Shed) गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला असल्याचं वृत्त आहे. (Pune Metro employee injured in firing) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड येथील मेट्रो कारशेडचे काम सुरू आहे. या कारशेडच्या शेजारी लष्कराच्या जवानांसाठी प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात जवानांची ट्रेनिंग सुरू असताना त्यापैकी एका जवानाच्या बंदूकीतून प्रॅक्टिस करत असताना झाडलेली गोळी मेट्रो कारशेडमधील पत्रा भेदून कारशेडमध्ये आली. भुसावळमधील खंडाळ्यात विवाहितेची आत्महत्या ही बंदुकीची गोळी मेट्रो कारशेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लागली. या कर्मचाऱ्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी दाखळ झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या