अख्खं पुणे झोपेत असताना मध्यरात्री उसळला आगडोंब, पाहा आगीचा भीषण VIDEO

अख्खं पुणे झोपेत असताना मध्यरात्री उसळला आगडोंब, पाहा आगीचा भीषण VIDEO

पुठ्ठ्याच्या गोडाऊनमधे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

  • Share this:

पुणे, 29 ऑक्टोबर : आगीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत मुंबईतील सिटी मॉलची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील हडपसर परिसरात रात्री उशिरा एका गोडाऊनमध्ये आग लागली होती. हे गोडाऊन पुठ्ठ्याचं असल्याची माहिती मिळाली आहे. या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीनं काही क्षणात रौद्र रूप धारण केलं आणि आग वेगानं पसरली. अख्खं गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी होतं. आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

पुण्यातील हडपसर गाव, राम मंदिर जवळ ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर युद्धपातळीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र गोडाऊनमध्ये पुठ्ठे आणि कागद असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरत होती. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता उंच आगीच्या ज्वाळा आणि धूराचे लोट दिसत आहेत.

हे वाचा-नकोशी पुन्हा कचराकुंडीत! पुण्यात निर्दयी मातेनं नाळ ठेचून नवजात अर्भक फेकलं

साधारण तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि त्यानंतर कुलिंग ऑपरेशनचं काम करण्यात आलं होतं. पुठ्ठ्यामुळे ही आग वेगानं पसरली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते तर आगीच्या ज्वाळा लांबपर्यंत दिसत होत्या. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पुठ्ठ्याच्या गोडाऊनमधे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 29, 2020, 7:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading