जीतू जगताप आत्महत्ये प्रकरणी दीपक मानकर पुन्हा गोत्यात !

जीतू जगताप आत्महत्ये प्रकरणी दीपक मानकर पुन्हा गोत्यात !

आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये माजी उपमहापौर दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.

  • Share this:

03 मे : दीपक मानकरांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता जीतू जगताप याने शनिवारी घोरपडी रेल्वे क्रॉससिंग जवळ आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये माजी उपमहापौर दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. त्यामुळे पुण्याचे राष्ट्रवादीचे माजी महापौर दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

जीतू जगताप

जीतू जगताप

मानकर आणि जगताप यांच्यामध्ये जागेच्या व्यवहारावरून वाद होते. यापूर्वी या दोघांची अत्यंत जवळीक होती मात्र एक जागेच्या व्यवहारातून दोघांमध्ये वितुष्ट आलं आणि त्यांचे वाद सुरू झाले. या प्रकरणात दीपक मानकर यांनी जीतू ब्लॅकमेल करत असल्याचा अर्ज ही पोलिसांकडे केला होता.

दीपक मानकर यांच्यावर यापूर्वीही जमीन हडपण्याचे आरोप झाले होते. त्या प्रकरणात मानकर यांना तुरुंगात ही जावं लागलं होतं मात्र त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. आता या प्रकरणात जितेंद्र जगताप यांच्या मुलाने लोहमार्ग पोलिसांकडे मानकर आत्महत्येला जबरदार असल्याची तक्रार केलंयानानंतर लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी मानकर, कर्नाटकी यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: June 3, 2018, 5:19 PM IST

ताज्या बातम्या