Home /News /pune /

पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल, अडीच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल, अडीच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर (gautam pashankar) यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गौतम पाषाणकर यांच्यावर मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे.

    पुणे, 12 सप्टेंबर : अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर (gautam pashankar) यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गौतम पाषाणकर यांच्यावर मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी 2 कोटी 40 लाख रुपये घेऊनसुद्धा फ्लॅट नावावर केला नाही, याप्रकरणी जाब विचारल्यानंतर कार्यालयात बोलावून मारहाण केल्याची तक्रार एकाने शिवाजीनगर पोलीस स्थानकात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम पाषाणकर यांच्यासह रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झाल्यामुळं गौतम पाषाणकर (gautam pashankar)  हे चर्चेत आले होते. त्यांच्या घरी एक चिठ्ठीही ठेवली होती. जवळपास 20 ते 25 दिवसांनी पोलिसांनी बाहेरच्या राज्यातून त्यांना ताब्यात घेतलं आणि पुन्हा पुण्यात आणलं होतं. याप्रकरणानंतर गौतम पाषाणकर पुन्हा फसवणूक केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळं चर्चेत आले आहेत. पुण्यातील मोठ्या उद्योजकांच्या यादीत गौतम पाषाणकरांचं नाव आघाडीवर असते. एका 43 वर्षीय व्यक्तीनं पाषाणकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे एका व्यावसायिक आहेत. त्यांना फ्लॅट घ्यायचा होता. यासाठी त्यांना खरडीत सुरू असलेल्या मे. प्रोक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या बहुमजली बांधकाम इमारतीमधील दोन फ्लॅट देण्यात आले. या फ्लॅटचा व्यवहार ठरला आणि करारनामा देखील झाला होता असे सांगण्यात येत आहे. 2 कोटी 87 लाख रुपयांना या दोन फ्लॅटचा व्यवहार ठरला होता. त्यांनी 2 कोटी 40 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅटचा ताबा आणि नोंदणीकृत दस्तावेज तयार केले नाही. तर फ्लॅटचे खरेदीखत देखील त्यांच्या नावावर केलं नाही. हे दोन्ही फ्लॅट दुसऱ्याच दोन व्यक्तींच्या नावावर केले, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यावरून पाषाणकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे वाचा - ”उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही”, चंद्रकांत पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तक्रारदारांनी याबाबत पाषाणकरांकडे विचारणा केली. त्यावेळी गौतम पाषाणकर यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या कार्यालयात त्यांना बोलावलं. तक्रारदार तिथे गेल्यानंतर पाषाणकर आणि त्यांच्या नोकरांनी त्यांना बेदम मारहाण केली, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या मारहाणीत पायाला गंभीर दुखापत झाल्याचं तक्रारदारांनी म्हटले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Pune crime news

    पुढील बातम्या