मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पाण्याची मोटर सुरू करण्यावरुन आळंदीत वाद, दोन कुटुंबातील तुंबळ हाणामारीचा VIDEO व्हायरल

पाण्याची मोटर सुरू करण्यावरुन आळंदीत वाद, दोन कुटुंबातील तुंबळ हाणामारीचा VIDEO व्हायरल

पाण्याची मोटर सुरू करण्यावरुन आळंदीत वाद, दोन कुटुंबातील तुंबळ हाणामारीचा VIDEO व्हायरल

पाण्याची मोटर सुरू करण्यावरुन आळंदीत वाद, दोन कुटुंबातील तुंबळ हाणामारीचा VIDEO व्हायरल

fight in two families in Alandi: पाण्याच्या मुद्द्यावरुन दोन कुटुंबात साब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

आळंदी, 3 नोव्हेंबर : पाण्याची मोटर सुरू करण्याच्या वादातून आळंदी परिसरात राहणाऱ्या दोन वारकरी कुटुंबात तुंबळ हाणामारी (fight between two groups) झाल्याची घटना घडलीय. आळंदीतील (Alandi) तापकीर गल्लीत राहणाऱ्या मस्के कुटुंबात ही तुंबळ हाणामारी झाली आहे. या प्रकरणात मस्के कुटुंबीयांनी दिघी पोलीस स्टेशनमध्ये (dighi police station) परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

शुल्लक कारणावरून दोन कुटुंबात झालेली ही हाणामारी एखाद्या जीवावर बेतू शकते अशीच आहे. विशेष म्हणजे दोन्हीही कुटुंब वारकरी सांप्रदायात परिचित आहेत. तसेच कीर्तन, प्रवचन करणारे आहेत. असं असून देखील शुल्लक कारणावरून होणाऱ्या वादावादीत या कुटुंबाचा संयम सुटला आणि ही हाणामारी झाली.

या घटनेत गणपत मस्के, आदिनाथ मस्के, मंगेश मस्के, अंकिता मस्के हे गंभीर जखमी झाल्याचं दृशांमध्ये दिसत आहे. तर अशाच प्रकारची मारहाण झाल्याचा आरोप ज्ञानोबा लक्ष्मण मस्के, त्यांची पत्नी कमल मस्के आणि मुलगा गोवर्धन मस्के यांनी देखील केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

पुण्यात एकट्या राहणाऱ्या आईचा भयावह अंत

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका हृदय हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द येथील एका इमारतीत एकट्या राहणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. अज्ञात चोरट्याने महिलेच्या डोक्यात वजनदार वस्तूने वार करत त्यांची हत्या केली आहे. यावेळी चोरट्याने घरातील 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने देखील चोरून नेले आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ओळखीतील लोकांनीच ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

शालिनी बबन सोनावणे असं हत्या झालेल्या 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेचं नाव असून त्या हिंगणे खुर्द येथील सायली अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत होत्या. तर त्यांचा 39 वर्षीय मुलगा विराट बबन सोनवणे हा शेजारच्याच इमारतीत राहत होता. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने शालिनी यांच्या घरात शिरून त्यांची निर्घृण हत्या केली आहे. तसेच घरातील 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

याप्रकरणी मुलगा विराट बबन सोनवणे याने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शालिनी सोनवणे या सायली अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. तर त्यांचा मुलगा विराट हा जवळच्याच एका इमारतीत वास्तव्याला आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास विराट आपल्या आईला भेटायला गेला होता.

First published:

Tags: Crime, Pune, Video viral