महिला तहसीलदाराची धडक कारवाई.. जिलेटीनने उडवल्या वाळू माफियांच्या 15 बोटी

महिला तहसीलदाराची धडक कारवाई.. जिलेटीनने उडवल्या वाळू माफियांच्या 15 बोटी

उजनी पाणलोट क्षेत्रात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या 15 बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवण्यात आल्या आहेत.

  • Share this:

इंदापूर, 7 सप्टेंबर: उजनी पाणलोट क्षेत्रात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या 15 बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवण्यात आल्या आहेत. धडाकेबाज महिला तहसीलदार सोनाली मेटकरी व महसूल विभागाने ही कारवाई केली आहे.वाळू माफियांचा सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

उजनी धरणाच्या पाटलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 15 बोटी इंदापूर महसूल विभागाने जिलेटीनच्या सहाय्याने उडवल्या. या कारवाईत जवळपास 50 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या कारवाईने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.

उजनी धरणाच्या पाटलोट क्षेत्रात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असतानाच तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी महसूल विभागाच्या मदतीने ही धाडसी कारवाई केली. उजनी धरणाच्या पाटलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या पंधरा बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवल्या. उजनी पाणलोट क्षेत्रातील भिगवण, तक्रारवाडी, कुंभारगाव या भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, इंदापूरचे सिंघम तहसिलदार श्रीकांत पाटील यांची बदली सोलापूरला झाल्याने वाळू माफियांना रान मोकळे झाले होते. निरा व भिमा नदीच्या खोऱ्यातील वाळू माफियांनी आपल्या बोटी दुरुस्त करून घेतल्या होत्या. नव्या तहसिलदार सोनाली मेटकरी यांना तालुक्याचा अभ्यास करण्यास वेळ लागेल, असा समज वाळूमाफियांनी करून घेतला होता. मात्र, सोनाली मेटकरी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अवैध वाळू माफियांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरूच ठेवले. मौजे शहा येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त केल्या होत्या. तहसीलदार यांच्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

'राष्ट्रवादी मेलबर्न', ऑस्ट्रेलियात पवारांचा कट्टर कार्यकर्ता! पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 7, 2019, 8:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading