Home /News /pune /

धक्कादायक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

धक्कादायक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

    पुणे, 13 ऑक्टोबर: भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने पुण्यातील वानवडी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. त्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. रश्मी आशुतोष मिश्रा असं आत्महत्या करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या देहरादून येथील रहिवासी आहेत. त्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. मृत रश्मी मिश्रा या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या. हेही वाचा-2 बाळांना सोबत घेत आईची आत्महत्या; सुसाईट नोटमधून धक्कादायक खुलासा दरम्यान 43 वर्षाच्या या महिला लष्करी अधिकार्‍यानी गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून लष्करी प्रशासनातील अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. मृत रश्मी मिश्रा यांनी कौटुंबीक कारणावरुन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित आत्महत्या लष्कराची संबंधित असल्याने या घटनेचा तपास वरिष्ठ पातळीवरुन सुरू करण्यात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Suicide

    पुढील बातम्या