कोरोनाच्या धास्तीनं पोलिसांनी चक्क आरोपीला सोडलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार

कोरोनाच्या धास्तीनं पोलिसांनी चक्क आरोपीला सोडलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार

एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण

  • Share this:

पिपंरी चिंचवड, 30 मे: एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण कोरोनाच्या धास्तीनं पोलिसांनी आरोपीला चक्क सोडून दिल्याचा धक्कादायर प्रकार उघड झाला आहे. आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून सोलापूर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे आहे.

हेही वाचा..कोरोनाचा कहर थांबता थांबेना! देशाच्या तुलनेत जळगावात चौपट मृत्यूदर

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सांगवी पोलिसांनी राजेश काळे यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, आरोपी राजेश काळे यांनी कारोना सदृष्य लक्षणे आढळल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिसही गांगरून गेले आणि त्याला पुन्हा हजर राहण्याची नोटीस देऊन चक्क सोडून दिले.

याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी दिलेल्या माहिती अशी की, आरोपी काळे याने सन 2002 मध्ये पिंपळे निलख येथील औदुंबर सोसायटीत एक फ्लॅट घेतला होता. बनावट दस्ताऐवज तयार करून तो फ्लॅट अनेकांना विकल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी काही ग्राहकांनी केलेल्या तक्रारी नुसार 2019 मध्ये सांगवी पोलिस ठाण्यात आणि 2007 मध्ये निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली काळे यांना ताब्यात घेण्यासाठी सांगवी पोलिस ठाण्यातील एक पथक सोलापूरला रवाना झाले. तिथून आरोपी काळेना घेऊन हे पथक शहरात दाखल झाले. शनिवारी दुपारी पुरावे गोळा करण्यासाठी सांगवी पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी करीत असताना आरोपीला सातत्यानं शिंका येत होत्या. तसेच त्यांना तापाची लक्षण जाणवत होती. हे कोरोनाची लक्षणे असल्याच पोलिसांच्या लक्षात आलं आणि पुढील धोका टाळण्यासाठी त्यास पुन्हा हजर राहण्याची नोटीस देऊन उपचाराकरता सोडून दिले, अशी अजब माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र, एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्यांची चाचणी अहवाल न घेताच सोडण्याची तरतूद आहे का किंवा तशा वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या का, या बाबत सांगवी पोलिसांना स्पष्टीकरण देता आलं नाही. त्यामुळे सांगवी पोलिसांचा कारभारावर शंका उपस्थितीत केली जात आहे.

हेही वाचा..मोठी बातमी! देशात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, सरकारकडून नवी गाईडलाईन जाहीर

दुसरीकडे नोटीस घेऊन पोलिसांच्या तावडीतून बाहेर पडलेले आरोपी उपमहापौर राजेश काळे यांचा फोनही नॉट रीचेबल येत असल्याने ते फरार झाले असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. कोरोनाची लक्षण असतानाही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल न करता खुल सोडल्यानं पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

First published: May 30, 2020, 10:10 PM IST

ताज्या बातम्या