पुण्यात 8 वर्षाच्या मुलीला वडिलांनी गळा दाबून मारलं, नंतर केली आत्महत्या

आठ वर्षीय मुलीचा खून करून पित्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 12:17 PM IST

पुण्यात 8 वर्षाच्या मुलीला वडिलांनी गळा दाबून मारलं, नंतर केली आत्महत्या

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 19 ऑगस्ट : पुण्यात लेकीचा जीव घेऊन पित्याने स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आठ वर्षीय मुलीचा खून करून पित्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. बाप-लेकीने अशा पद्धतीने जीव गमावल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतं आहे.

श्रद्धा आशिष भोंगळे(वय 8)असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे तर आशिष भोंगळे(वय 49)असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पित्याचं नाव आहे. आशिष आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. रोजच्या वादाला कंटाळून पत्नी घर सोडून दुसरीकडे राहत होती. त्यांच्यामध्ये सतत कौटुंबिक वाद होत होते. याच वादाला कंटाळून आशिष यांनी जीवन संपवण्याचं चोकाचं पाऊल घेतलं असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या -  एसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'

पत्नी वेगळी राहत असताना 8 वर्षाच्या श्रद्धाची जबाबदारी ही आशिष यांच्यावर होती. श्रद्धा तिच्या वडिलांकडे राहत होती. शनिवारी सायंकाळी आशिष यांनी श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांनी स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली. घरातून कोणीच बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि घटनेचा उलगडा झाला.

Loading...

इतर बातम्या -  मुंबईत भावाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आईकडून देहविक्रीसाठी जबरदस्ती

स्थानिकांकड़ून प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून श्रद्धा आणि आशिष यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस गुन्ह्याची कसून चौकशी करत आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये मुलीचा खून आणि नंतर स्वत: आशिष यांनी आत्महत्या का केली याचा अद्याप ठोस कारण पोलिसांनी मिळालेलं नाही. त्यासाठी पोलीस शेजाऱ्यांची आणि आशिष यांच्या पत्नीची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: murderpune
First Published: Aug 19, 2019 12:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...