पुण्यात खळबळजनक घटना, भांडणात बापाने केला 5 महिन्याच्या मुलीचा खून

पुण्यात खळबळजनक घटना, भांडणात बापाने केला 5 महिन्याच्या मुलीचा खून

लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. तसंच खून, मारामारी अशा प्रकारांमध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे.

  • Share this:

पुणे, 9 मे : कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे चर्चेत असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. जन्मदात्या वडिलांनीच 5 महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्या केली आहे. पुण्यातील बावधन इथं ही घटना घडली. बाबूराव जाधव असं आरोपी वडिलांचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बाबूराव जाधव आणि संगीता जाधव या पती-पत्नीचे घरगुती वादातून जोरदार भांडण झालं. या भांडणावेळी रागावलेल्या बाबूराव जाधव याने थेट आपल्या 5 महिन्याच्या मुलीवरच हल्ला केला. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. जन्मदात्या बापानेच मुलीचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. तसंच खून, मारामारी अशा प्रकारांमध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे. मुठेवाडगाव इथं सासऱ्याने जावयाची हत्या केली आहे. भांडण झाल्यानंतर सासऱ्याने मित्रांच्या मदतीने जावयावर तलवार आणि इतर धारदार शस्र्यांनी वार करत त्याची हत्या केली. मयूर आकाश काळे (वय 28) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे.

याप्रकरणी मृत मयूर काळे याची पत्नी मोनिका काळे हिने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात सासरा सचिन काळे (रा. मुठेवाडगाव, ता.श्रीरामपूर), संदिप काळे, (रा.भेंडाळा, ता.गंगापूर) व बुंदी काळे (रा. मिरजगाव, ता.कर्जत) व एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना पकडले असून संदीप काळे हा फरार आहे.

वाचा- राज्याला 1 लाख 40 हजार कोटींचा फटका बसणार, तज्ज्ञगटाच्या अहवालातील 13 मोठ्या गोष्टी

 

First published: May 9, 2020, 2:00 PM IST
Tags: pune news

ताज्या बातम्या