पुणे, 28 मे: अभ्यास न केल्यानं सात वर्षीय अल्पवयीन मुलीला वडिलांनी बेदम मारहाण (father beat daughter) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी लाटण्याने आणि हातातने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलीचा हात मोडला (father broke daughters hand) आहे. या प्रकरणी पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वडिलांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या मारहाणी दरम्यान आरोपी वडिलांनी मुलीचा लैंगिक छळ केल्याचा संशय ( Suspicion of sexual harassment) पोलिसांना आहे. त्यामुळे न्यायालयाने चौकशीसाठी आरोपी वडिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
संबंधित अटक केलेल्या आरोपी वडिलांचं नाव नागेश महादेव जाधव असून ते पुण्यातील रहिवासी आहे. आरोपी जाधव पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी मंगळवारी (25 मे) रात्री साडे अकराच्या सुमारास आपल्या पोटच्या मुलीला अभ्यास न केल्यानं लाटण्याने आणि हाताने बेदम मारहाण केली आहे. यानंतर आरोपीनं पीडितेच्या आईलाही शिवीगाळ केली. शिवाय या 7 वर्षीय पीडित मुलीचा हातही मोडला आहे. याप्रकरणी घराशेजारी राहणाऱ्या मिनाज विशाल भोले यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हे वाचा-रक्ताचं नातं जीवावर उठलं, घरासाठी भावाने घेतला भावाचा जीव!
यापूर्वीही अनेकदा केली मारहाण
संबंधित पीडित मुलीनं अभ्यास न केल्यानं यापूर्वी वडिलांनी तिला अनेकदा मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा सुटली आहे. तसेच ऑनलाइन शिक्षणामध्येही अनेक अडचणी आहेत. असं असताना 7 वर्षाच्या चिमुकलीला बेदम मारहाण केल्यानं परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हे वाचा-बापरे! इंटरनेटवर VIDEO पाहून केली पत्नीची हत्या; विरारमधील घटनेने खळबळ
लैंगिक छळाचा पोलिसांना संशय
पीडित मुलीनं अभ्यास न केल्यानं वडिलांनी मारहाणीसोबतचं लैंगिक छळ केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात आरोपी वडिलांची पोलीस कोठडी मागून घेतली आहे. वडिलांनी मुलीचा लैंगिक छळ केल्याचा अद्याप कोणताही पुरावा समोर आला नाही. पण पोलिसांनी या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beating retreat, Crime news, Pune