मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेत तळ्यात बुडून मृत्यू

मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेत तळ्यात बुडून मृत्यू

दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्या दोघांनी जीव वाचवण्यासाठी एकमेकांना मिठी मारली.

  • Share this:

सुमीत सोनवणे,(प्रतिनिधी)

दौंड,10 नोव्हेंबर: मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणारे मोहन आबा जाधव (वय 40) हे मुलगा किरण जाधव, सून प्राचीसह देऊळगाव राजे येथील शेतकरी सुनील ननावरे यांच्या शेतात मासेमारी करण्यासाठी गेले होते. तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली.

मासेमारी करताना मोहन जाधव यांचा पाय घसरला आणि ते शेत तळ्यात पडले. त्यावेळी ते शेततळ्यात बुडू लागले. त्यांनी आरडाओरड केली असता त्यांचा मुलगा किरण याने वडिलांना वाचवण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला. पण तोही पाण्यात पडला. दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्या दोघांनी जीव वाचवण्यासाठी एकमेकांना मिठी मारली. परिसरात दुपारच्या कोणीही नसल्यामुळे किरणची पत्नी ही ओरडत मालक ननावरे यांच्याकडे गेली. तिने सर्व प्रकार ननावरे यांना सांगितला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना घेऊन शेततळ्याकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत बाप-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. जाधव कुटूंब हे मूळचे बारामती तालुक्यातील निंबुत येथील राहणारे आहेत. कामानिमित्त ते दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे राहत होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीरंग शिंदे पुढील तपास करत आहेत.

मामाच्या गावाला आलेल्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा लिंबोडी तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटली आहे. संकेत बापू आघाव (वय-7) व महेश सतीश आंधळे (वय-9) अशी मृत मुलांची नावे असून ते आते-मामे भाऊ होते.

आष्टी तालुक्यातील खिळद येथील संकेत बापु आघाव हा आईसोबत भाऊबीजनिमित्त मामाच्या गावी लिंबोडी येथे आला होता. शनिवारी सायंकाळी संकेत त्याच्या मामाचा मुलगा महेशसोबत शेतात गेला होता. अचानक एक बैल पळाल्याने त्यास पकडण्यासाठी कैलास आंधळे हे धावले. संकेत व महेश हे ही त्यांच्या मागे तलावाच्या दिशेने धावले. तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा बुडून मृत्यू झाला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या