पुणे, 11 मे : पुण्यातील फरासखाना (Faraskhana Police Station) पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर सय्यद (Sameer Syed) यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी गाझियाबादमध्ये (ghaziabad) गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावाने पोलिसांवर कोयत्या आणि लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनमधील कर्मचारी समीर सय्यद यांची 5 मेच्या रात्री निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातील तपासासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधील पथक गाझियाबादमध्ये गेलं होते. आरोपी प्रवीण महाजनची प्रेयसी गाझियाबादला पळून गेली होती. तिला आणण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले होते. पण, जमावाने पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवला. पोलीस कर्मचाऱ्यांना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.
ग़ाज़ियाबाद के नंदग्राम में दबिश देने आए महाराष्ट्र पुलिस कर्मियों की पिटाई करते हुए और गाड़ी को तोड़ते हुए वीडियो वायरल.. pic.twitter.com/pfs3lFAJCK
— Himanshu Sharma (@himanshujourn) May 11, 2021
या व्हिडीओमध्ये जमावातील काही तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेरले असून जमिनीवर पाडून लाथाबुक्याने मारहाण करत आहे. या तरुणाच्या हातात कोयते आणि लोखंडी रॉड दिसत आहे. या जमावाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली आहे. या हल्लात पोलीस जखमी झाले आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील फरासनखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस हवालदार समीर सय्यद यांची 5 मे रोजी मंगळवारी रात्री 1 वाजता प्रवीण महाजन याने चाकूने गळा चिरून हत्या केली होती. प्रत्यक्षात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या एका महिलेच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली होती.समीर सय्यद हे आरोपी महाजन याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद याच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती. तोच राग डोक्यात धरून महाजन याने सय्यद यांचा खून केला, असावा असा अंदाज वर्तवण्यात आला.
या प्रकरणी प्रवीण महाजनला पोलिसांनी अटक केली होती. प्रवीण महाजन हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहे. त्यामुळे प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. तडीपार असताना त्याने पुण्यात येईल, सय्यद यांचा खून केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील महिला शोधून तिचा जबाब घेणे गरजेचं होतं, यासाठी पुणे पोलीस हे गाझियाबाद इथं गेलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.