पुणे, 30 मे : पुणे-सातारा महामार्गावर केळवडे गावच्या हद्दीत दुमजली फार्म हाऊसवरील बंगल्यामध्ये पैशाची उधळण करत मुलामुलींचा डान्स सुरू होता. यावेळी राजगड पोलिसांच्या छाप्यात 13 जणांना अटक केली. या सर्वांवर पोलिसांनी कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. 2007 पासून असे प्रकार सुरूच आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळावडे येथील सुमित प्रकाश साप्ते (रा. गाऊडदरा, ता. हवेली) यांच्या मालकीच्या केळवडे येथे असलेल्या दुमजली बंगल्यामध्ये रंगीबेरंगी लाईटचा उजेड करून व मोठ्या आवाजाचा साऊंड लावून मुलं आणि मुली नृत्य करीत होत्या. या फार्म हाऊसवर डान्स चालू असून पैशाची उधळण सुरू आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात तातडीने कळविली. त्यानंतर शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजता पोलिसांनी या फार्म हाऊसवर छापा टाकला.
नाशकात मुसळधार पाऊस; वादळीवाऱ्यात कांदा शेड जमीनदोस्त, शेकडो क्विंटल कांदा भिजला
मुलांसह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 5 आणि ठाणे जिल्ह्यातील एका मुलीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे व उपाययोजनांचा भंग केला म्हणून त्यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे शहरानजीकच्या निसर्गरम्य गावांमधील खासगी फार्महाउस वरून अशा प्रकारच्या डान्सपार्ट्या रंगण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याची सुरूवात 2007 सालापासूनच झाली. तत्कालीन एसपी विश्वासराव नांगरे-पाटील यांनी डोनजे गावातील रेव्ह पार्टीवर धाड टाकल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. पुणे शहर हे शिक्षण आणि आयटी हब बनल्यानंतर हे पुणे ग्रामीण भागातून हे किळसवाणे प्रकार वाढू लागले.
सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला वेग
निसर्गरम्य भागातील खासगी फार्महाउस भाड्याने घ्यायचे आणि तिथे ह्या अशा नशिल्या पार्ट्या आयोजित करून तरूणाईला आकर्षित करण्याचा धंदा या भागात चोरीछुपे पद्धतीने सुरू आहे. यामध्ये आता ठेकेदार मंडळी, दोन नंबरच्या पैशातून गब्बर झालेली माफिया मंडळीही मोठ्या प्रमाणावर गुंतली आहेत. मुंबई, ठाण्यातून डान्सबार गर्ल बोलवायच्या आणि फार्महाउसवरील खासगी पार्ट्यांमधून नाचवायच्या हा एक नवीनच ट्रेंड पुणे ग्रामीणच्या परिसरात सुरू झाल्याचं बघायला मिळतंय.
पंधरा दिवसांपूर्वी तर कुडजे गावातून अशाच एका पार्टीत चक्क पुणे मनपाचा एक उप अभियंताच रंगेहात सापडला होता. त्यानंतर केळवडे गावातला हा प्रकार समोर आला. म्हणूनच पुणे ग्रामीणचे एसपी डॉ. अभिनव देशमुख यांनी आता या अशा अवैध डान्सबार पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मोठी मोहीमच हाती घेतली आहे. त्याला फक्त आता स्थानिक पोलिसांची मदत मिळणं गरजेचं आहे. कारण अनेकदा अशा पार्ट्या ह्या हप्ते वसुलीवाल्या वसुलदार पोलिसांच्या आशिर्वादानेच सुरू असल्याचं आढळून आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune crime, Pune news, पुणे