Elec-widget

''उद्धव यांनी वडिलांचा 'हिंदुत्त्ववाद' नव्हे आजोबांचा 'निर्धमीवाद' अंगीकारावा''

''उद्धव यांनी वडिलांचा 'हिंदुत्त्ववाद' नव्हे आजोबांचा 'निर्धमीवाद' अंगीकारावा''

सामाजिक सुधारणा हेच प्रबोधनकारांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही..

  • Share this:

पुणे,28 नोव्हेंबर:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवाजी पार्कवर संध्याकाळी ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाकताना बाळासाहेबांचा कट्टर हिंदुत्ववाद बाजूला ठेऊन आजोबा प्रबोधनकारांचा निर्धमीवाद अंगीकारावा, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली आहे. महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त पुण्यातील फुले वाड्यात आयोजित फुले समता पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात श्रीपाल सबनीस बोलत होते.

प्रबोधनकारांनी कशालाही दिली नाही दाद...

पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.

महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त पुण्यातील फुले वाड्यात आयोजित फुले समता पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मुक्ता टिळक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित आहेत. समता परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एक लाख मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फादर दिब्रिटो हे उस्मानाबाद येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

फादर दिब्रिटो हे नुसतेच फादर नाहीत, ते अस्सल मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा समतेचा विचार खूप महत्त्वाचा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. फादर दिब्रिटो यांच्या हातात फक्त बायबलच नाही तर ते तुकोबांची गाथाही वाचून तिचा परदेशात प्रसार करतात. फादर दिब्रिटो हे समतेचाच पुरस्कार करतात म्हणून त्यांना हा समतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महात्मा फुले यांनी ब्राह्मणांचाही कधीच द्वेष केला नाही, उलट त्यांच्या मुलांचा सांभाळ केला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com