प्रसिद्ध सराफा व्यावसायिकानं छातीत झाडली गोळी, पुण्यातील धक्कादायक घटना

प्रसिद्ध सराफा व्यावसायिकानं छातीत झाडली गोळी, पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यातील एका प्रसिद्ध सराफा व्यावसायिकानं पिस्तूलनं छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 16 डिसेंबर: पुण्यातील एका प्रसिद्ध सराफा व्यावसायिकानं पिस्तूलनं छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिलिंद मराठे (वय-60) असं या व्यावसायिकाचं नाव आहे. ते मराठे ज्वेलर्सचे मालक आहेत.

मिलिंद मराठे यांना नातेवाईकांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे लक्ष्मी रोडवरील मराठे ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा.. मेट्रो कारशेडचे काम थांबवा, हायकोर्टाच्या आदेशावर आदित्य ठाकरे म्हणाले...

मिळालेली माहिती अशी की, मिलिंद मराठे यांचं शहरातील लक्ष्मी रोडवर मराठे ज्वेलर्स नावानं सराफी शॉप आहे. काल, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता ते शॉपमध्ये होते. त्यांच्या कॅबिनमध्ये अचानक गोळी झाडल्याचा आवाज झाला. आवाज ऐकून शॉपमधील इतर कर्मचाऱ्यांनी मराठे यांच्या कॅबिनकडे धाव घेतली. मराठे यांनी स्वत:च्या पिस्तूलमधून छातीत गोळी झाडल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी मराठे यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवलं. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक अडचण त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे मिलिंद मराठे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा...अजित पवारांचा राजकीय बॉम्ब! भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर

दरम्यान, मराठे यांनी छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असावा, यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पुणे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 16, 2020, 1:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या